
सामना ऑनलाईन । मुंबई
फटाके उडवताना काळजी घ्या, असे निर्देश असतात. फटकांच्या पाकिटांवरही तसे नमूद केले असते. पण या सगळ्या नियमांना फाटा देत एक व्यक्ती पेटती सिगारेट तोंडात धरून त्याच्या सहाय्याने रॉकेट पेटवून सोडत आहे, असा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. आता त्या व्यक्तीची ओळख पटली आहे.
सध्या सोशल मीडियावर हा व्हिडीयो व्हायरल होत आहे. सर्वप्रथम हा व्हिडीयो PyarSeMario या ट्विटर अकाऊंटवरून नासाची माफी मागून शेअर केला गेला. नंतर अकिंता शर्मा या ट्विटर युसरने या काकांना रॉकेट सोडण्यासाठी कसे हायर करता येईल, असा प्रश्न विचारून हा व्हिडीओ शेअर केला होता.
I’m sorry @NASA pic.twitter.com/ITur4daVsI
— ㅤ ㅤ ㅤ ㅤ ㅤ ㅤ ㅤ ㅤ (@PyarSeMario) August 28, 2018
सिगारेटने रॉकेट सोडणार्या व्यक्तीचे नाव मल्ला संजीव राव आहे. ते आंध्रप्रदेशमधल्या विशाखापट्टणम जिल्ह्यातील पिसनिकाडा गावाचे रहिवासी आहेत. राव हे शेतकरी असून फटाके विक्रीचा त्यांचा जोडधंदा आहे. मंगळवारी वायएसआर काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष जगन मोहन रेड्डी यांची चिमलापल्ली येथे रॅली होती. रेड्डीचें स्वागत करण्यासाठी राव हे सिगारेट मधून रॉकेट पेटवत होते.
अशा प्रकारे फटाके फोडणे हे धोकादायकच आहे. व्हिडीओत जरी राव यांना कुठलीच दुखापत झाली नसली तरी, फटाके फोडताना आवश्यक ती काळजी घ्यावी.