उकडलेल्या अंड्याच्या 9 सेकंदाच्या व्हिडीओला 2 दिवसात साडे तीन मिलियन्स व्ह्यूज

3163

व्हॉट्सऍप, फेसबुक, ट्विटर आणि इन्स्टाग्रामसारख्या माध्यमांचा वापर वाढल्याने अनेक व्हिडीओ आणि फोटोंचा दररोज सोशल मीडियावर पाऊस पडताना दिसतो. अनेकदा यातील काही व्हिडीओ अथवा फोटोंना क्षणात नेटिझन्सचा एवढा प्रतिसाद मिळतो की तो व्हिडीओ टाकणाराही अचंबित होतो. सध्या असाच एक व्हिडीओ ट्विटरवर धुमाकूळ घातल आहे. उकडलेल्या अंड्याचा हा व्हिडीओ असून अवघ्या 9 सेकंदाच्या या व्हिडीओला 2 दिवसात साडे तीन मिलियन्स व्ह्यूज मिळाले आहेत.

शरीराला आवश्यक असणारी सर्व पोषणमूल्ये अंड्यातून मिळत असल्याने शारीरिक तंदुरुस्तीसाठी आहारात नियमितपणे अंड्याचा समावेश करण्याचा सल्ला तज्ज्ञ देतात. त्यामुळे ऑम्लेट किंवा उकडलेले अंडी खाण्याकडे सर्वांचा कल असतो. परंतु अनेकदा उकडलेल्या अंड्याचे कवच काढणे जिकरीचे काम असते. याच संदर्भात ट्विटरवर ‘मेड यू स्माईल’ (Madeyousmile) या अकाऊंटवरून व्हिडीओ अपलोड करण्यात आला.

‘मेड यू स्माईल’ (Madeyousmile) या ट्विटर अकाऊंटला अवघे काही फॉलोअर्स असतानाही यावरून अपलोड करण्यात आलेला अंड्याचे कवच काढण्याच्या सोप्या पद्धतीचा व्हिडीओ हिट ठऱला. 6 जानेवारी, 2020 ला अपलोड करण्यात आलेला हा व्हिडीओ आतापर्यंत साडे तीन मिलियन्सपेक्षा जास्त लोकांनी पाहिला आहे. या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती उकडलेले अंडे काचेच्या ग्लासमध्ये टाकते आणि बेसीनमध्ये त्या ग्लासात पाणी भरते. पाणी भरल्यानंतर हा ग्लास थोड्यावेळ हलवल्यानंतर अंडे बाहेर काढते आणि त्याचे कवच आरामात निघते.

ट्विटरवर फेमस झालेल्या या व्हिडीओ नेटिझन्सकडून प्रतिक्रियाही मिळत आहेत. अनेकांना ही सोपी पद्धत आवडल्याचे दिसत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या