
आपल्या मुलांच्या पालनपोषणासाठी आई काहीही करू शकते, याचेच दर्शन घडवणारा एक हृदयस्पर्शी व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडीओत दिसतेय की, आई तिच्या ताह्या बाळाला कुशीत घेऊन ई-रिक्षा चालवत असताना रस्त्यावरील ग्राहकांना प्रवासाबाबत विचारताना दिसत आहे. प्रवाशी रिक्षात बसल्यानंतर ती आई रिक्षा चालवून पुढच्या प्रवासाला निघते. ‘माँ तुझे सलाम’ असे म्हणत नेटिझन्सनी या मातेच्या जिद्दीचे आणि धाडसाचे कौतुक केले आहे. या मातेसाठी नेटकऱयांनी सोशल मीडियावर मदतीची हाक मारली आहे.

























































