भगव्या जर्सीला विराटने दिले 10 पैकी 8 मार्क

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । बार्ंमगहॅम

यंदाच्या विश्वचषक स्पर्धेतील टीम इंडियाच्या भगव्या जर्सीबद्दलचा संभ्रम अखेरीस संपला आहे. इंग्लंडविरुद्ध सामन्यासाठी हिंदुस्थानी संघ भगव्या रंगाची जर्सी घालून बार्ंमगहॅमच्या मैदानावर उतरणार आहे. आयसीसीने यंदाच्या हंगामात होम आणि अवे सामन्यांकरिता वेगळ्या रंगाची जर्सी घालण्याचा नियम केला आहे. त्यानुसार हिंदुस्थानी संघ इंग्लंडविरुद्ध सामन्यासाठी भगव्या रंगाची जर्सी घालणार आहे.

इंग्लंडविरुद्ध सामन्याआधी हिंदुस्थानी संघाचा कर्णधार विराट कोहलीने पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी विराटला नवीन जर्सीबद्दल प्रश्न विचारण्यात आला. यावेळी विराटने आपल्याला ही जर्सी आवडली असून केवळ एका सामन्याकरिता खेळाडू ही जर्सी घालणार असल्यामुळे याला 10 पैकी 8 मार्क देईन, असे म्हटले आहे.