
हिंदुस्थानी क्रिकेटला आक्रमकता, स्फूर्ती आणि विराट यश मिळवून देणाऱया विराटपर्वाने आज कसोटीतून निवृत्ती घेतली. त्याच्या अफलातून आणि अद्वितीय अशा कारकीर्दीवर अवघ्या क्रिकेटविश्वाने स्तुतिसुमनांचा वर्षाव केला. कोहलीच्या विराट पर्वाला मानवंदना करताना क्रिकेटच नव्हे, तर क्रीडाविश्वातील दिग्गजांनी त्याच्या भावी आयुष्यासाठी आणि कारकीर्दीसाठी भरभरून शुभेच्छा दिल्या.
कसोटी क्रिकेटमध्ये युगाचा अंत – बीसीसीआय
कसोटी क्रिकेटमध्ये एका युगाचा अंत झाला असला तरी त्याचा वारसा हिंदुस्थानी क्रिकेटसोबत सदैव असेल. त्याचे योगदान सदैव स्मरणात राहील.
सिंहाचं काळीज असलेला माणूस – गौतम गंभीर
‘सिंहाचं काळीज असलेला माणूस! विल मिस यू चिकू… तू निवृत्त झालास ! विश्वासच बसत नाहीय – रवी शास्त्री
‘विराट तू अचानक कसोटी क्रिकेटमधून निवृत्त झालास. विश्वासच बसत नाहीये. युवा पिढीचा तू लिजेंड आहेस. तुझ्या नेतृत्वात टीम इंडियाच्या कसोटी क्रिकेटची दिशा बदलली. कसोटीतही तुझा आक्रमक बाणा कायम राहिला. सुखद आठवणींसाठी धन्यवाद. या आठवणींसाठी मी सदैव जपून ठेवीन.’
असाधारण फिटनेस, शिस्त आणि प्रतिबद्धता – जय शहा
अद्वितीय अशा कसोटी कारकीर्दीसाठी शुभेच्छा विराट. टी-20 क्रिकेटच्या जगात कसोटी क्रिकेटची लोकप्रियता कायम राखण्यासाठी आणि असाधारण फिटनेस, शिस्त आणि प्रतिबद्धता सादर केल्याबद्दल तुझे आभार.
महान खेळाडूंसारखा खेळलास – युवराज सिंग
कसोटी क्रिकेटसाठी तू आपल्यात असलेल्या योद्धय़ाचा शोध घेतलास आणि आपले त्यासाठी आपले सर्वस्व अर्पण केलेस. तू महान खेळाडूंसारखा खेळलास. छातीत आग आणि प्रत्येक पावलांवर गर्व. पांढऱ्या जर्सीला तुझ्या कामगिरीवर अभिमान आहे.
तुझी उणीव प्रखरतेने जाणवेल – जसप्रीत बुमरा
तुझ्या नेतृत्वाखाली पदार्पण केल्यानंतर तुझ्यासोबत देशाला नव्या उंचीवर पोहोचवेपर्यंत तुझ्या वेडेपणाची आणि तुझ्या ऊर्जेची प्रखरतेने उणीव भासेल. कसोटी क्रिकेटचा राजदूत – वीरेंद्र सेहवाग
जेव्हा तुला पाहिले तेव्हाच कळलं की तू खास आहेस. तू मोठय़ा आत्मियतेने कसोटी क्रिकेट खेळलास. ते पाहणे नेहमीच आनंददायी होते. तू कसोटी क्रिकेटचा एक उत्कृष्ट राजदूत आहेस.
खऱया अर्थाने लिजंड – अॅबी डिव्हीलियर्स
माझ्या बिस्कोटीला (एकमेकांना प्रेमाने हाक मारतात) शानदार कसोटी कारकीर्दीसाठी शुभेच्छा. तुझ्या काwशल्याने अवघ्या जगाला प्रेरित केलेय. तू खऱया अर्थाने लिजंड आहेस.