एक सामना, दोन रेकॉर्ड! कोहलीची पाँटिंग, मियांदादवर आघाडी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । पोर्ट ऑफ स्पेन

विंडीजविरुद्ध 42वे शतक झळकावत हिंदुस्थानी कर्णधार विराट कोहलीने रविवारी वन डेत सर्वाधिक सहा शतकांसह ऑस्ट्रेलियन रिकी पाँटिंगला मागे टाकले. शिवाय वन डेत विंडीजविरुद्ध सर्वाधिक धावांचा पाकच्या जावेद मियांदादचा 1930 धावांचा विक्रमही मोडला.

गेलच्या 300 वन डे
वेस्ट इंडीजचा फलंदाज ख्रिस गेल याने वन डे क्रिकेटमध्ये आज इतिहास रचला. हिंदुस्थानविरुद्धचा आजचा दुसरा वन डे सामना खेळून गेल हा 300 वन-डे सामने खेळणारा वेस्ट इंडीजचा पहिला फलंदाज ठरला. यापूर्वी वेस्ट इंडीजच्या कोणत्याही फलंदाजाला अशी कामगिरी करता आलेली नाही.