नाणेफेक गमावल्यानंतर कर्णधार विराट म्हणाला, तर आम्हीही…

28

सामना ऑनलाईन । मॅनचेस्टर

आयसीसी क्रिकेट वर्ल्डकप स्पर्धेतील 22 वा सामना टीम इंडिया आणि पाकिस्तानमध्ये मॅनचेस्टरमध्ये रंगत आहे. या लढतीत पाकिस्तानने नाणेफेक जिंकून हिंदुस्थानला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले आहे. वर्ल्डकपमध्ये टीम इंडियाचे पाकिस्तानविरुद्धचा रेकॉर्ड दमदार आहे. 1992 ते 2015 पर्यंत झालेल्या 6 लढतीत टीम इंडियाने पाकिस्तानचा पराभव केला आहे. दरम्यान, टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली म्हणाला की, नाणेफेक जिंकला असता तर आम्हीही प्रथम गोलंदाजी घेतली असते.

हिंदुस्थान वि. पाकिस्तान लढतीचे लाईव्ह अपडेट पाहा – World cup 2019 LIVE
मॅनचेस्टरवर ’20 साल बाद’, बुमराह प्रसादच्या कामगिरीची पुनरावृत्ती करणार?

नाणेफेक गमावल्यानंतर विराट म्हणाला की, ‘खेळपट्टी पाहता आम्हीही नाणेफेक जिंकला असता तर प्रथम पाकिस्तानला फलंदाजीसाठी आमंत्रित केले असते. खेळपट्टी दमदार असून आमच्याकडे दोन फिरकीपटू आहेत. दोन प्रतिस्पर्ध्यातील हा मोठा सामना असल्याने सर्वांचे याच्याकडे लक्ष असणार आहे. जे आपल्या नब्जवर नियंत्रण मिळवतील ते जिंकतील असेही विराट म्हणाला. आम्ही संघात एकमेव बदल केला असून शिखर धवनच्या जागी अष्टपैलू विजय शंकरला स्थान देण्यात आले आहे. तो एक चांगला फलंदाज, गोलंदाज आणि क्षेत्ररक्षक आहे.’

आपली प्रतिक्रिया द्या