कोहलीला आणखी एक विक्रम रचण्याची संधी

1218
virat-kohli-whistle

धावांचा रतीब घालणारा Virat Kohli विराट कोहली आता विक्रम मोडण्याचेही विक्रम करायला लागला आहे. हिंदुस्थान आणि ऑस्ट्रेलियामध्ये 14 जानेवारीपासून 3 एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेला सुरुवात होणार आहे. या सामन्यासाठी कोहली मैदानात उतरेल तेव्हा आणखी एक विक्रम आपल्या नावावर करण्याची त्याच्याकडे संधी चालून आलेली असेल.

कोहलीला हिंदुस्थानी क्रिकेटचा इतिहास शिकवा रे!

विराट कोहली हा कर्णधार म्हणून सगळ्या प्रकारच्या क्रिकेट सामन्यांमध्ये सर्वाधिक आंतरराष्ट्रीय शतके करण्याच्या विक्रमापासून एक पाऊल दूर आहे. त्याच्या नावावर एक शतक झाले की तो ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटींग याचा विक्रम मोडू शकेल. पाँटींगने कर्णधार म्हणून जबाबदारी पार पाडत असताना 41 शतके ठोकली होती. कोहलीने गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात पाँटींगच्या विक्रमाशी बरोबरी साधली होती. इडन गार्डन इथे झालेल्या सामन्यात त्याने शतक झळकावले होते.

विराट कोहली दहशतवाद्यांच्या हिटलिस्टवर, प्रथमच स्टार खेळाडू दहशतवाद्यांच्या टार्गेटवर

कर्णधार म्हणून सर्वाधिक शतके झळकावणाऱ्यांच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर दक्षिण आफ्रिकेचा माजी क्रिकेटपटू ग्रॅमी स्मित हा तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने 33 शतके झळकावली होती. विराट कोहलीने कर्णधार म्हणून खेळत असताना कसोटी सामन्यांमध्ये 20 तर एकदिवसीय सामन्यांमध्ये 21 शतके झळकावली होती. रिकी पाँटींगने 376 एकदिवसीय खेळींमध्ये 41 शतके झळकावली आहे. कोहलीला हा टप्पा गाठायला अवघे 196 खेळी पुरे झाल्या आहेत.

कर्णधारपद स्वीकारल्यानंतर दबावामुळे किंवा अन्य कारणांमुळे क्रिकेटपटूंची कामगिरी समाधानकारक होत नाही. कोहलीचे याच्या अगदी उलट असल्याचं पाहायला मिळत आहे. कर्णधारपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतरही कोहलीच्या सातत्यपूर्ण प्रदर्शनात काहीही फरक पडलेला नाहीये. कर्णधार म्हणून खेळत असताना कोहलीने कसोटी सामन्यात 63.80 च्या सरासरीने धावा केल्या आहेत. तर एकदिवसीय सामन्यात 77.80 च्या सरासरीने धावा केलेल्या आहेत. कर्णधार नसताना कोहलीने कसोटी सामन्यात 54.97 च्या सरासरीने धावा केल्या होत्या तर एकदिवसीय सामन्यात कर्णधार नसताना 59.84 च्या सरासरीने धावा केल्या होत्या. आकडेवारीवरून ही बाब स्पष्ट होतेय की कर्णधारपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर कोहलीचा खेळ आणखी बहरत गेलेला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या