
वेस्ट इंडिजविरुद्धच्या 3 टी-20 लढतीच्या मालिकेतील तुफानी फलंदाजीच्या बळावर टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने 5 स्थानांची झेप घेत आयसीसी टी-20 रँकिंगमध्ये 10 स्थानावर मजल मारली आहे. आयसीसीने नुकत्याच जाहीर केलेल्या टी-20 गुणांकनात तीन हिंदुस्थानी फलंदाजांनी टॉप 10 फलंदाजांत स्थान मिळवले आहे.
हिंदुस्थानचा सलामीवीर के. एल. राहुल या यादीत 794 अंकांसह सहाव्या स्थानी असून हिटमॅन रोहित शर्मा 686 गुणांसह नवव्या आणि कर्णधार विराट कोहली 685 गुण मिळवत दहाव्या स्थानी आहे.पाकिस्तानचा बाबर आझम याने 879 गुणांसह टॉपचे स्थान स्वतःकडे राखले आहे. ऑस्ट्रेलियाचा ऍरॉन फिंच 810 गुणांसह दुसऱ्या स्थानी आहे.विशेष म्हणजे टी-20तील टॉप टेन फ़लंदाजांत ऑस्ट्रेलियाच्या दोन तर हिंदुस्थानच्या तीन फलंदाजांनी स्थान मिळवले आहे.
टी-20चे अव्वल दहा फलंदाज
रँक खेळाडू गुणांकनाचे गुण
1 बाबर आजम (पाकिस्तान) 879
2 एरॉन फिंच (ऑस्ट्रेलिया) 810
3 डेविड मलान (इंग्लंड) 782
4 कॉलिन मुनरो (न्यूझीलंड) 780
5 ग्लेन मैक्सवेल (ऑस्ट्रेलिया) 766
6 लोकेश राहुल (हिंदुस्थान ) 734
7 एविन लुइस (वेस्टइंडीज) 699
8 हजरतउल्लाह ज़जाई (अफगाणिस्तान) 692
9 रोहित शर्मा (हिंदुस्थान) 686
10 विराट कोहली (हिंदुस्थान) 685
























































