दहिसरमध्ये भव्यदिव्य व्हर्च्युअल प्रॉडक्शन स्टुडिओ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

‘जुदा  होके भी’ या संपूर्णपणे आभासी निर्मितीमध्ये बनवलेल्या जगातील पहिल्या चित्रपटाचे यश नुकतेच मुंबईत साजरे करण्यात आले. यावेळी महेश भट्ट, विक्रम भट्ट आणि के सेरा सेराचे अध्यक्ष सतीश पंचारिया उपस्थित होते. व्हर्च्युअल वर्ल्ड बनवत असलेल्या आणखी दोन चित्रपटांची घोषणाही यावेळी करण्यात आली.

त्यातलाच एक ‘कायलोन’ हा चित्रपट हिंदीसोबतच इंग्रजीतही बनवला जाणार आहे, ज्याचे दिग्दर्शन विक्रम भट्ट करणार आहेत. त्याचवेळी 1920 फ्रँचायझी  ‘1920 हॉरर ऑफ द हार्ट’चीदेखील घोषणा करण्यात आली, ज्याचे दिग्दर्शन विक्रम भट्ट यांची मुलगी कृष्णा भट्ट करणार आहे. ‘1920’च्या सिक्वेलमध्ये अविका गोर मुख्य भूमिकेत असेल. यावेळी विक्रम भट्ट यांनी सतीश पंचारिया यांच्या सहकार्याने उघडलेल्या देशातील पहिल्या आणि सर्वात मोठय़ा व्हर्च्युअल प्रॉडक्शन स्टुडिओबद्दल सांगितले. त्यांनी दहिसर हायवेवर देशातील पहिला व्हर्च्युअल प्रॉडक्शन स्टुडिओ उघडला आहे. तो 50 हजार स्क्वेअर फूट क्षेत्रात पसरलेला असून येथे एकावेळी चार चित्रपट शूट करण्यासाठी चार मजले आहेत.