नगर- शहराचे ग्रामदैवत श्री विशाल गणेश मंदिरात गणेश जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नगर शहराचे ग्रामदैवत श्री विशाल गणेश मंदिर येथे मंगळवार दि.28 रोजी होणार्‍या गणेश जयंतीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

यंदाच्या वर्षी गणेश जयंतीदिनीच अंगारकी चतुर्थीचा योग हा दुग्धशर्करा योग आहे. यानिमित्त पहाटे अभिषेक, श्रींची महापूजा, विधीवत धार्मिक कार्यक्रम, त्यानंतर सामुदायिक गणपती अथर्वशीर्ष पठण, श्रींचा जन्मोत्सव, महिला भजनी मंडळाचे कार्यक्रम व रात्री 8.30 वा. श्री दक्षिणमुखी हनुमान सत्संग मंडळाचा हनुमान चालिसाचा कार्यक्रम होणारआहे, अशी माहिती देवस्थानचे अध्यक्ष अ‍ॅड.अभय आगरकर यांनी दिली.

या दिवशी मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई, गर्भगृहात फुलांची सजावट, दर्शन रांग आदिंची व्यवस्था करण्यात आली आहे. उत्सव यशस्वीतेसाठी उपाध्यक्ष पंडितराव खरपुडे, सचिव अशेाक कानडे, सहसचिव रामकृष्ण राऊत, खजिनदार पांडूरंग नन्नवरे, सहखजिनदार विजय कोथिंबीरे, उत्सव समितीचे चेअरमन बाबासाहेब सुडके, विश्‍वस्त हरिश्‍चंद्र गिरमे, चंद्रकांत फुलारी, बापूसाहेब एकाडे, ज्ञानेश्‍वर रासकर, शिवाजी शिंदे, रंगनाथ फुलसौंदर, गजानन ससाणे, प्रकाश बोरुडे आदिंसह महंत योगी संगमनाथ महाराज आदी प्रयत्नशील आहेत.