विशाल निकम ठरला बिग बॉस मराठी सिझन 3 चा विजेता

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बिग बॉस मराठीच्या तिसऱ्या सिझनचा फिनाले आज पार पडला असून सर्वांचा लाडका स्पर्धक विशाल निकमने यात बाजी मारली आहे. विशालला सर्वाधिक मतं मिळाल्याने तो बिग बॉसचा विजेता ठरला. विशालला बिग बॉसची ट्रॉफी व 25 लाख रुपयांचा चेक बक्षिसाच्या स्वरुपात मिळाला.

विशाल हा पहिल्या दिवसापासून घरात एक तगडा स्पर्धक म्हणून ओळखला जात होता. विशाल सोबत मीनल शहा, जय दुधाने, विकास पाटील, उत्कर्ष शिंदे यांच्यामध्ये विजेतपदासाठी तगडी स्पर्धा होती. मात्र XXXXXX हा खेळातून पहिला बाहेर पडला. त्यानंतर XXXXX, XXXX हे बाहेर झाला. त्यानंतर विशाल व XXX यांच्यात विजेतेपदासाठी अखेरची चुरस रंगली. त्यात विशालने बाजी मारली. विशालच्या विजयाच्या आधी घरातल्या बहुतांश माजी स्पर्धकांनी विशाल विजयी होणार अशी भाकीतं मांडली होती. अखेर विशालने बाजी मारली.

विशाल सुरुवातीापसून या घरात विकास पाटील, सोनाली पाटील व मीनल शहा या तिघांसोबत खेळत होता. या चौघांच्या बी टीममधून तिघे म्हणजेच मीनल, विकास विशाल हे फायनलला आले होते