वाडयाच्या रुद्रशंभो अ‍ॅग्रीरिच शेतकरी उत्पादक कंपनीची दापोली विद्यापीठाला भेट

पालघर जिल्हयातील रुद्रशंभो अॅग्रीरिच शेतकरी उत्पादक कंपनीने दापोलीच्या कोकण कृषी विद्यापीठाला भेट दिली. यावेळी त्यांनी फळप्रक्रियेविषयी डॉ. चंद्रकांत पवार यांचेकडून संपूर्ण माहिती घेतली. विद्यापीठाचे विस्तार शिक्षण संचालक डॉ. प्रमोद सावंत यांचेसमवेत त्यांनी कुलगुरु डॉ. संजय भावे यांची भेट घेतली. त्यावेळी बोलताना त्यांनी कंपनीच्या विविध उपक्रमांची माहिती दिली. त्यामध्ये चटई रोपवाटिका पध्दतीने लागवड 150 हेक्टर क्षेत्रावर केल्याचे त्यांनी सांगितले.

कंपनीच्या भागधारकाला एक एकर क्षेत्रासाठी भात लावणी ते कापणी यंत्राच्या सहाय्याने करण्यासाठी फक्त 600 रुपये खर्च येतो. तर भातरोपासहित एक एकर क्षेत्रासाठी भाडे तत्वावर 8000 रुपये एवढी रक्कम आकारुन ही कंपनी लागवड करुन देते. वाडयाच्या या शेतक-यांनी वाडा कोलमची चव, प्रत आणि त्याचे गुणधर्म याची विस्तृत माहिती कुलगुरु डॉ. भावेंना दिली. या भेटीचे आयोजन कृषि विज्ञान केंद्र, पालघरच्या अनुजा दिवटे, तालुका तंत्र व्यवस्थापक हरेष बांगर यांनी शेतक-यांनी स्वयंस्फूर्तीने व स्वखर्चाने केले होते. विद्यापीठाने केलेल्या सहकार्याचे शेतक-यांनी समाधान व्यक्त केले. या उपक्रमामध्ये अध्यक्ष कोंडू काष्टे, सचिव हरिष्चंद्र म्हसकर, खजिनदार विकास सावंत, भाई सावंत, केदार सावंत , तालुका तंत्र व्यवस्थापक हरेश बांगर, कृषि अभियांत्रिकी कोसबाडच्या अनुजा दिवटे यांचे सहकार्य मिळाले होते. यावेळी कुलगुरुंचे तांत्रिक अधिकारी डॉ. मंदार खानविलकर, कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्राचे व्यवस्थापक डॉ. संतोष वरवडेकर उपस्थित होत