सीएसएमटी-करमाळी तेजस एक्सप्रेसला विस्टाडोम कोच, निसर्गाचा आनंद लुटता येणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गोव्याला जाताना आता पर्यटकांना निसर्गाचा मनमुराद आनंद लुटता यावा यासाठी सीएसएमटी -करमाळी ट्रेन क्र.22119 / 22120 तेजस एक्सप्रेसला उद्या 15 याआधी सीएसएमटी -मडगाव जनशताद्बी एक्सप्रेसला पारदर्शक छताचा विस्टाडोम कोच बसविण्यात येणार आहे. त्यानंतर मुंबई ते पुणे मार्गावरील ‘डेक्कन एक्स्प्रेस’, ‘डेक्कन क्वीन’, प्रगती एक्स्प्रेसला ही सुविधा उपलब्थ झाली आणि अलिकडे पुणे -सिंकदराबाद एक्स्प्रेसला विस्टाडोम कोच बसविण्यात आला.

2018 मध्ये प्रथम सीएसएमटी ते मडगाव जनशताब्दी एक्स्प्रेसला पारदर्शक छताचा विस्टाडोम कोच लावण्यात आला होता. विस्टाडोम कोचना प्रवाशांची पसंती लाभल्याने मुंबई ते पुणे मार्गावरील खंडाळा व लोणावळा घाटातील निसर्ग सौंदर्याचा आस्वाद घेता यावा यासाठी ‘डेक्कन एक्स्प्रेस’ला 26 जून 2021 पासून ‘विस्टाडोम’ कोच लावण्यात आला. त्यानंतर मुंबई-पुणे मार्गावरच धावणाऱया ‘डेक्कन क्वीन’ एक्स्प्रेसला, प्रगती एक्स्प्रेस पुणे-सिंकदराबाद एक्स्प्रेसला विस्टाडोम कोच बसवण्यात आला आहे.

n मोठय़ा आयताकार खिडक्या आहेत. तसेच एलईडी लाइट, रोटेटेबल सीट आणि पुश बॅक चेअर, टेलिव्हीजन क्रीन, विद्युत संचालित स्वयंचलित स्लायडींग कम्पार्टमेंट दरवाजे, दिव्यांगासाठी अधिक रूंद साइड स्लायडींग दरवाजे, पारदर्शक छत तसेच निसर्ग पाहण्यासाठी स्वतंत्र व्हीविंग गॅलरी अशा सुविधा आहेत.