श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात लगीन घाई… शाही विवाह सोहळ्याची जय्यत तयारी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

श्री विठ्ठल रुक्मिणीचा आज विवाह सोहळा संपन्न होतोय, या शाही लग्नाची तयारी जोरदार सुरु आहे. शहनाईच्या आवाजाने मंदिर परिसर मंत्रमुग्ध झालाय मंदिराचा गाभारा 20 रंगाच्या आकर्षक फुलांनी सजविण्यात आला आहे.

देवाच्या लग्नाला भक्त व्हराडीची मोठी गर्दी असते. लग्नाच्या पार्श्वभूमीवर मंदिर सजावटीसाठी झेंडू, शेवंती, गुलाब, निशीगंध एथोरम, आरकेड, कामीनी, तगर, अष्टर, बिजली, ग्लॅडीओ, जरबेरा,  तुळशी  अशा 14 प्रकारच्या पानाफुलांची सजावट करण्यात आली आहे.

यामध्ये विविध प्रकारच्या 20 पाना फुलांची रंग संगती करण्यात आली आहे. यामध्ये विठ्ठल रुक्मिणीचा गाभार्‍यात अशा फुलांची खास सजावट करण्यात आली आहे.  याबरोबरच मंदिरातील प्रवेशद्वार,  सोळखांबी, सभामंडप या ठिकाणी फुलांची सजावट करण्यात आली आहे. फुलांच्या सावटीने देवाचे रुप अधिकच खुलून दिसत आहे. पुणे येथील भाविक दिलीप भुजबळ यांच्या वतीने ही आरास करण्यात आली आहे.   लक्ष्मी फ्लॉवर्स यांच्या 50 कलाकारांनी ही रात्रीतून फुलांची सावट केली आहे. सजावटीसाठी सुमारे 2 हजार फुलांचा वापर केला आहे.  तर पुणे येथील संतोष आढागळे यांनी सभामंडपात आकर्षक रांगोळी काढली आहे.

आज सायंकाळी देवाची शहरातून शोभायात्रा काढण्यात येणार आहे. या शोभा यात्रेत मुळशी येथील नरसिंह तरुण मंडळा ढोल व झांज पथक सहभागी होणार आहे. देवाच्या विवाह सोहळ्यासाठी भाविकांची मोठी गर्दी असते.