मोदींच्या मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची ‘या’ अभिनेत्याची इच्छा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आयुष्यावर आधारित ‘पीएम नरेंद्र मोदी’ या चित्रपटामध्ये मोदींची भूमिका साकारणारा अभिनेता विवेक ओबेराय चर्चेत आला आहे. भारतीय जनता पक्षाच्या स्टार प्रचारकांमध्ये विवेक ओबेरायचा समावेश करण्यात आल्याचेही वृत्त आहे. याच दरम्यान, राजकारणामध्ये प्रवेश केला तर 2024 ला गुजरातमधील वडोदरा येथून लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा असल्याचे विवेक ओबेरायने म्हटले आहे.

vivek-oberoy-modi

‘पीएम नरेंद्र मोदी’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये सध्या विवेक ओबेराय व्यस्त आहे. वडोदरामधील पारुल विश्वविद्यालयात विद्यार्थ्यांशी संवाद साधताना विवेक ओबेरायने मोदींच्या मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. विवेक म्हणाला की, मी राजकारणामध्ये आलो तर 2024 ला वडोदरातून लोकसभा निवडणूक लढवण्याबाबत विचार करू शकतो. 2014 ला लोकसभा निवडणुकीमध्ये येथील लोकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना मोठा पाठिंबा दिला होता.

लोकसभा निवडणुकीचे पडघम सुरू असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चित्रपटाला काँग्रेससह विरोधकांना विरोध केला आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनावर निवडणूक काळात बंदी घालण्याची मागणी करण्यात आली आहे. या याचिकेवर तात्काळ सुनावणी करण्यास उच्च न्यायालयाने शुक्रवारी नकार दिला होता.

आपली प्रतिक्रिया द्या