व्हीजेटीआयमधील कंत्राटी कर्मचाऱ्यांना दिलासा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

व्हीजेटीआयमधील कंत्राटी कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला आहे. कोरोना महामारीमुळे कोणत्याही कर्मचाऱ्यांना कमी करणार नाही तसेच सर्व कर्मचाऱ्यांच्या नवीन नियुक्तीचे आदेश नोव्हेंबरपासून काढण्यात येतील. कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या रोजंदारी तत्त्वावर न करता त्यांना मासिक वेतन देण्यात येईल, असे संस्थेच्यावतीने स्पष्ट करण्यात आले. युवासेना कोषाध्यक्ष, नगरसेवक अमेय घोले यांच्या नेतृत्वाखाली युवासेना सिनेट सदस्य प्रदीप सावंत, शितल शेठ देवरुखकर, निखिल जाधव, वैभव थोरात यांच्यासह स्थानिक शिवसेना पदाधिकारी यांनी संस्थेच्या उपकुलसचिवांची भेट घेतली.