व्होडाफोन हिंदुस्थानातून गाशा गुंडाळण्याची शक्यता, आयडियावरही गंडांतर

1922

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर टेलिकॉम कंपनी व्होडाफोन आणि आयडियावर गंडांतर आले आहे. प्रत्येक महिन्याला होणार्‍या नुकसाननंतर आपला व्यवसाय चालवणे दोन्ही कंपन्यांना कठीण जाणार आहे. आज दोन्ही कंपन्यांनी आपली महत्त्वाची बैठक बोलावली आहे. या बैठकीनंतर दोन्ही कंपन्यांचे भविष्य ठरणार आहे.

व्होडाफोन आणि आयडियाला 53 हजार कोटींचा समायोजित सकल महसूल  जमा करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. तर कंपनीला तिसर्‍या तिमाहीत 6 हजार 439 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. ही सलग सहावी तिमाही आहे ज्यात कंपनीला सातत्याने कोट्यवधींचे नुकसान झाले आहे. हे वृत्त पसरताच कंपनीचे शेअर 20 टक्क्यांनी कोसळले आहेत. सातत्याने आर्थिक नुकसानीमुळे व्होडाफोन हिंदुस्थानमधून आपला व्यवसाय बंद करण्याची शक्यता आहे. तसेच आयडियावरही गंडांतर आलेले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या