
टेलिफोन क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी व्हाेडाफोन आणि आयडिया या दोन्ही कंपन्या अखेर एकत्र आल्या आहेत. कंपनीकडून सोमवारी आपल्या नव्या व्हाेडाफोन आयडिया लिमिटेडची घोषण करीत ’व्हीआय’ या नव्या ब्रॅण्डची घोषणा कंपनीची मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र टक्कर यांनी केली. या अंतर्गत हिंदुस्थानात 2जी, 3जी आणि 4जीची सुविधा देण्यात येणार असल्याचे यावेळी जाहीर करण्यात आले आहे. या नव्या ब्रॅण्डची घोषणा करताना व्हीआयने सर्वात मोठा स्पेक्ट्रम पोर्टफोलिओ, प्रचंड क्षमता आणि बिल्ट-इन 5 जी असलेले तंत्रज्ञानद्वारे जागतिक दर्जाचे नेटवर्क निर्माण केले असल्याची घोषणा देखील यावेळी केली आहे. सध्या ही नवी योजना दिल्ली व मुंबई यासह अनेक ठिकाणी सुरु करण्यात येणार आहे. याकेळी व्हाेडाफोन आयडिया लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र टक्कर म्हणाले की, ‘एकमेकामध्ये विलीन झालेल्या दोन एंटिटी म्हणून व्हाेडाफोन आयडिया दोन वर्षांपूर्वी एकत्र आल्या. तेव्हापासून आम्ही दोन मोठी नेटवर्क, आमचे मनुष्यबळ आणि आमच्या प्रक्रिया यांचे एकात्मिकरण करण्याकर लक्ष केंद्रित केले आहे.



























































