व्हॉल्वो कार कंपनीने तीन हजार जणांना काढले

प्रसिद्ध ऑटोमोबाईल कंपनी व्हॉल्वो कार्सने तीन हजार कर्मचाऱ्यांची कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. ही कर्मचारी कपात स्वीडनमधील कार्यालयात केली जाणार आहे. जागतिक मंदीचा हवाला देत कंपनीने कार्यालयातील 15 टक्के स्टाफला नोकरीवरून काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे, असे वॉल्वो कार्सचे सीईओ हॉकन सॅम्युल्सन यांनी सांगितले. कंपनीने मागील महिन्यात 29 एप्रिलला कॉस्ट अँड पॅश अॅक्श प्लानची घोषणा केली होती. याअंतर्गत जागतिक स्तरांवरील खर्चात कपात केली जाणार आहे. याचाच एक भाग म्हणून कर्मचारी कपात केली जात आहे.