नगर जिल्ह्यात मतदार याद्या पुनरीक्षण कार्यक्रम; 21 जुलै ते 30 नोव्हेंबरदम्यान राबवणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

केंद्रीय निवडणूक आयोगाने 01/01/2024 या अर्हता दिनांकावर आधारीत छायाचित्र मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनःरिक्षण कार्यक्रम जाहीर केला आहे. या कार्यक्रमाचा प्रमुख उद्देश मतदानापासून वंचित राहिलेल्या मतदारांना आणि नवीन मतदार म्हणून पात्र असलेल्या मतदारांना संधी देणे तसेच नाव नोंदणी वाढविणे व दोष विरहित मतदार याद्या तयार करणे हा आहे. मतदार याद्या पुनःरिक्षण कार्यक्रम नगर जिल्ह्यात 21 जुलै 2023 ते 30 नोव्हेंबर 2023 या कालावधीत राबविला जाणार आहे, अशी माहिती अशी माहिती जिल्हाधिकारी सीताराम सालीमठ यांनी दिली.

यावेळी निवडणूक विभागाचे उपजिल्हाधिकारी राहुल पाटील, सुनील गोसावी आदी यावेळी उपस्थित होते. जिल्हाधिकारी सालीमठ म्हणाले, या कालावधीत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी हे मतदारांच्या घरोघरी भेटी देवून माहिती संकलित करणार आहेत. त्यासाठी त्यांना सर्व नागरिकांनी सहकार्य करावे असे ते म्हणाले.

18 वर्ष पूर्ण झालेल्या परंतु मतदार यादीत नाव न नोंदवलेल्या नागरिकांची यादी तयार करणे. 01/01/2024, 01/04/2024 01/07/2024 व 01/10/2024 रोजी 18 वर्ष पूर्ण करणा-या नव मतदारांची यादी तयार करणे.. दुबार, मयत, स्थलांतरीत मतदारांची माहिती संकलित करून नमुना 7 भरणे. मतदार यादीतील मतदारांच्या तपशिलात असणा-या त्रुटी/चुका दुरुस्त करणे. आगामी लोकसभा निवडणूक 2024 च्या अनुषंगाने मतदान केंद्राची 100% तपासणी व सुसूत्रीकरण 1. मतदान केंद्रावर मतदारांसाठी आवश्यक सुविधाची पाहणी करणे (पिण्याचे पाणी, लाईट, फर्निचर,स्वच्छतागृह, रॅम्प इत्यादी.) धोकादायक पडकी झाल्यास नविन मतदान केंद्र / प्रस्तावित करणे. एका मतदान केंद्रात 1500 पेक्षा जास्त मतदार झाल्यास लगतच्या मतदान केंद्रात मतदार समाविष्ट करणे शक्य नविन मतदान केंद्र प्रस्तावित करणे अशी कामे करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले

मतदान केंद्राचे इमारतीचे नाव बदलले असल्यास मतदान केंद्राच्या नावात बदल बाबत प्रस्ताव करणे. मतदार यादी विशेष संक्षिप्त पुनः रिक्षण कार्यक्रमांतर्गत दिनांक 17 ऑक्टोबर 2023 रोजी एकत्रित प्रारुप मतदार प्रसिध्द करणेत येणार आहे. प्रारूप मतदार यादी प्रसिध्द झाल्यानंतर प्रत्येक मतदाराने प्रारूप मतदार यादीत आपले नाव आहे किंवा नाही? याची खात्री करावी. मतदार यादीत नाव नसल्यास त्यासाठी आपला फॉर्म नमुना 6 म्हणजेच मतदार नांव नोंदणीसाठी आवश्यक नमुना फॉर्म भरुन संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकारी किंवा तहसिल कार्यालयातील मतदार मदत केंद्रात जमा करावाअसे ते म्हणाले.

ज्या व्यक्तीचे दि. 01/01/2024 रोजी वय 18 वर्ष पूर्ण होत आहे, परंतु मतदार यादीत नांव नाही, अशा व्यक्तीने आपले नांव मतदार यादीत समाविष्ट करुन घेणेसाठी फॉर्म नमुना 6 भरुन द्यावा असे ते म्हणाले. नगर जिल्ह्यामध्ये 3722 मतदान केंद्राच्या परिसरामध्ये हा कार्यक्रम राबविण्यात येणारा असून विशेष उपाययोजना सुद्धा या नगर जिल्ह्यामध्ये करण्यात येणार आहे जेणेकरून जे 18 वर्षाचे नोंदणी मतदार होणार आहेत त्यासाठी कॉलेज महाविद्यालय स्तरावर सुद्धा नोंदणी करण्यात येणार असल्याचेही जिल्हाधिकारी सालीमठ यांनी सांगितले.

नगर जिल्ह्यामध्ये 35 लाख 67 हजार 817 एकूण मतदार आहेत यामध्ये 18 लाख 56 हजार 564 पुरुष तर 17 लाख 11 हजार 85 महिला व इतर 168 असे मतदार आहेत जास्तीत जास्त मतदान नोंदणी व्हावी यासाठी सुद्धा सर्व स्तरावर प्रयत्न केले जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले

एक सप्टेंबर 2000 रोजी 18 वर्षे पूर्ण करणारे नव मतदार नाव नोंदणीसाठी आगाऊ अर्ज करू शकतील असेही ते म्हणाले नगर जिल्ह्यामध्ये प्रारूप मतदार यादी 17 ऑगस्टला प्रसिद्ध केली जाणार आहे त्यानंतर पुढील प्रक्रिया राबवली जाणार आहे 5 जानेवारी 2024 रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.