
गुजरात विधानसभेच्या 93 जागांसाठी उद्या सोमवार, 5 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे तर पहिल्या 89 व दुसऱ्या 93 अशा 182 जागांचा फैसला 8 डिसेंबरला समोर येईल. संपूर्ण देशाचे गुजरात विधानसभेच्या निवडणुकीकडे लक्ष लागले आहे.
संवेदनशील आणि महत्त्वाच्या जागांसाठी निवडणूक विभागाकडून यंत्रणा सज्ज झाल्या आहेत. अटीतटीचा सामना होणाऱ्या विविध मतदान केंद्रांवर सुरक्षा यंत्रणा तैनात केल्या आहेत.
भाजपला धोबीपछाड
केंद्र सरकारने संपूर्ण मंत्रिमंडळ प्रचारासाठी गुजरातमध्ये बसवले आहे. मात्र, या निवडणुकीत सर्वात जास्त आपचा बोलबाला राहील, असा जाणकारांचा अंदाज आहे.


























































