वाघनदीच्या पुरात शेतकरी वाहून गेला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

त्र्यंबकेश्वर तालुक्यातील वांगणपाडा येथील शेतकरी शनिवारी दुपारी वाघनदीच्या पुरात वाहून गेला. रविवारी दुपारी ओझरखेडजवळील नदीपात्रात त्यांचा मृतदेह आढळला, अशी माहिती हरसूल पोलिसांनी दिली.

त्र्यंबकेश्वर तालुक्यातील मुरंबीपैकी वांगणपाडा येथील शिवराम तुळशीराम खुताडे (56) हे शनिवारी नातेवाईकांकडे बैल द्यायला गेले होते. मात्र ते घरी परतले नाहीत. त्यांच्या पत्नी मीराबाई यांनी ते बेपत्ता असल्याची तक्रार हरसूल पोलीस ठाण्यात दाखल केली. शनिवारी दिवसभर परिसरात पावसाची संततधार होती, वाघनदीला आलेल्या पुरात पाण्याचा अंदाज न आल्याने खुताडे वाहून गेल्याची शक्यता परिसरातील ग्रामस्थांनी वर्तविली होती. आपत्ती व्यवस्थापन विभाग व हरसूल पोलीस कालपासून त्यांचा शोध घेत होते. रविवारी दुपारी दीड वाजता मृतदेह ओझरखेडजवळील नदीपात्रात आढळला.