
पाश्चिमात्य देशांतील अनेक दिग्गज कंपन्यांचे अन्य देशांतील सुपर मार्केट एकतर गाशा गुंडाळण्याच्या बेतात आहेत किंवा ते विकायला काढले आहेत. यामध्ये वॉलमार्टसारख्या दिग्गज कंपन्यांच्या स्टोअरचा समावेश आहे.
जगातील 250 मोठय़ा रिटेल चेन दहा देशांमध्ये आहेत. त्यांना एक चतुर्थांश उत्पन्न आंतरराष्ट्रीय व्यवसायातून मिळते. विदेशांतून गाशा गुंडाळणाऱया कंपन्यांमध्ये ब्रिटिश सुपर मार्केट चेन टेस्कोचे नाव आघाडीवर आहे. थायलंड आणि मलेशियातील दोन हजार स्टोअर विकण्याचा विचार करीत आहे. ‘वॉलमार्ट’ ही जगातील सर्वात मोठी कंपनी मानली जाते, मात्र उत्पन्नाचा विचार करता तिलादेखील विदेशात व्यावसायिक विस्तार करणे कठीण होत असून दक्षिण कोरिया आणि जर्मनीतून काढता पाय घेतला आहे.





















































