घुसखोरांची काळजी आताच का, सरकार ११ वर्षे झोपले होते का? समाजवादी पक्षाचा भाजपवर हल्लाबोल

समाजवादी पक्षाच्या खासदार डिंपल यादव यांनी घुसखोरांच्या मुद्द्यावरून केंद्रातील मोदी सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे. त्यांनी प्रश्न केला की, “सरकार ११ वर्षे झोपले होते का? आता त्यांना घुसखोरांना हाकलून लावण्याची आठवण झाली.” डिंपल यादव यांनी भाजपवर मुख्य मुद्द्यांपासून लक्ष विचलित करत असल्याचा आरोप.

डिंपल यादव यांनी म्हटले आहे की, जर केंद्र सरकारला माहिती असेल की किती घुसखोर आहेत, तर त्यांनी त्यांची ओळख पटवून सांगावे की नेमके कोण-कोण घुसखोर आहेत? दिल्लीत माध्यमांशी संवाद साधताना त्या असं म्हणाल्या आहेत.

याआधी समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी उत्तर प्रदेशातील घुसखोरांच्या मुद्द्यावर भाजप सरकारवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. म्हणाले होते की, ते ११ वर्षांपासून सत्तेत आहेत. सीमेवर सैन्य आणि केंद्रीय यंत्रणा काय करत होत्या? हे सर्व गरिबांना त्रास देण्याचे षड्यंत्र आहे.