ठाण्यातही बुधवारी पाणीबाणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आधीच पाणीटंचाईच्या झळा सोसणाऱ्या ठाणेकरांना आता आणखी एका गैरसोयीला सामोरे जावे लागणार आहे. पालिकेच्या पाणीपुरवठा योजनेतील पिसे तसेच टेमघर जलशुद्धीकरण केंद्रातील सबस्टेशनमधील पावसाळ्यापूर्वी देखभाल व दुरुस्तीची कामे हाती घेण्यात येणार आहेत. त्यामुळे येत्या बुधवार, ३ जूनला सकाळी ९ ते रात्री ९ वाजेपर्यंत पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे. यामध्ये कंट्रोल पॅनलची दुरुस्ती, ट्रान्सफॉर्मर ऑईल फिल्ट्रेशन आणि अन्य तांत्रिक कामांचा समावेश आहे.

येथे पाणी येणार नाही
घोडबंदर रोड, लोकमान्य नगर, वर्तकनगर, साकेत, ऋतूपार्क, जेल, गांधीनगर, रुस्तमजी, सिद्धांचल, इंदिरानगर, रूपादेवी, श्रीनगर, समतानगर, सिद्धेश्वर, इटरनिटी जंक्शन, मुंब्रा तसेच कळव्याच्या काही भागांमध्ये बुधवारी सकाळी ९ ते रात्री ९ वाजेपर्यंत वाजेपर्यंत पार्ण पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे.