
मुंबई महानगर पालिकेच्या महत्त्वपूर्ण ‘वॉटर फॉर ऑल’ उपक्रमाची पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडून आज घोषणा करण्यात आली आहे.
1 मे रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत या उपक्रमाची सुरुवात होणार आहे. महापालिका प्रशासनासोबत आज महत्त्वपूर्ण बैठक करण्यात आली. ‘वॉटर फॉर ऑल’ उपक्रमाने बेकायदा कनेक्शनचा प्रश्न सुटणार, घराघरात स्वच्छ, पुरेसे पाणी पोहचवणार असल्याचे सांगण्यात आले.
मुंबई महापालिका आयुक्त प्रशासक इकबाल सिंह चहल, यांच्यासह पालिका प्रशासनासोबत पालिका मुख्यालयात चर्चा झाली.
























































