परळीत पाण्याची पाईपलाईन फुटली, हजारो लिटर पाणी वाया

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी। परळी वैजनाथ

परळीत राणी लक्ष्मीबाई टॉवर जवळ पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन फुटल्याने हजारो लिटर पाणी वाया गेले. यामुळे परिसरात पाणीच पाणी झाले . विशेष म्हणजे ही पाईपलाईन नवीन योजनेची असल्याने याची परिसरात चांगलीच चर्चा रंगली आहे. पाईपलाईन फुटण्याचे नेमके कारण मात्र अद्याप समजू शकले नाही.

शहरातल्या काही भागात पिण्याचे पाणी भेटत नाही असे असताना टॉवर परिसरात रविवारी सायंकाळी ६ च्या सुमारास पाईपलाईन फुटल्याने हजारो लिटर पाण्याची नासाडी झाली. ही पाईपलाईन फुटल्याने टॉवर जवळील काही दुकानात पाणीही गेले होते. बाहेर ठेवलेले सामानही भिजले असून पाणी रस्त्यावर जमा झाले आहे. यामुळे नागरिकांची गैरसोय झाली आहे.