
बीड शहराला पाणीपुरवठा करणार्या बिंदुसरा आणि माजलगाव धरणाच्या पाण्याची पातळी वाढली आहे. त्यामुळे बीड शहराला दर तीन दिवसाआड पाणीपुरवठा होणार आहे.
चालू वर्षाच्या पावसाळ्यात सुरुवातीला कमी पावसामुळे पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला होता बीड शहराला आठ दिवसाआड तर काही ठिकाणी दहा दिवसानंतर पाणीपुरवठा करण्याची वेळ आली. होती परंतु परतीच्या पावसाने बिंदुसरा धरणात 70 ते 80 टक्के पाणीसाठा उपलब्ध झाला असून माजलगाव धरणात जवळपास 69% पाणीसाठा उपलब्ध आहे. अमृत अटल योजनेच्या माध्यमातून शहरासाठी 11 जलकुंभाचे काम जलद गतीने सुरू असून त्यापैकी पाच जलकुंभाचे काम पूर्ण झाले आहे. यातील तीन जलकुंभातून शहराला तीन दिवसांआड पाणीपुरवठा सुरू केला जाणार असल्याची माहिती नगराध्यक्ष डॉ भारतभूषण क्षीरसागर यांनी दिली आहे.
अमृत अटल योजनेच्या माध्यमातून सुरू असलेले काम लवकरच पूर्ण होणार असून शहराच्या सर्वच भागात पाणीपुरवठा उपलब्ध होणार आहे.
























































