सत्ता केंद्र नाही, आमचा संविधानावर विश्वास- सरसंघचालक

317

आम्ही जेव्हा म्हणतो की देशातील सर्व लोक हिंदू आहेत याचा अर्थ असा होत नाही की लोकांना आपला धर्म बदलावा लागेल असे सरसंघचालक मोहन भागवत म्हणाले. तसेच आम्हाला कुठल्याही सत्ता केंद्राची गरज नाही आमचा संविधानावर पूर्ण विश्वास आहे असेही भागवत म्हणाले. उत्तर प्रदेशच्या एका कार्यक्रमात ते बोलत होते.

भागवत म्हणाले की, “जेव्हा आम्ही किंवा संघाचे कार्यकर्ते म्हणतो की हा देश हिंदुंचा आहे. इथले 130 कोटी लोक हिंदू आहेत याचा अर्थ असा होत नाही की, आम्हाला लोकांचे धर्मपरिवर्तन करायचे आहे. किंवा कुणाला भाषा किंवा जात बदलायची आहे असे नाही. तुम्ही भारतमातेचे सुपुत्र आहात, इथल्याच पूर्वजाचे वंशज आहात, या संस्कृतीचा कमी अधिक प्रभाव सगळ्यांवर आहे. सगळ्यांनी आपापल्या पंथांशी एकनिष्ठ रहा, जातिभेद पाळून नका, आपल्या समाजबांधवांच्या विकासाचा विचार करा.” तसेच संघाला कुठल्याही प्रकारे सत्ता केंद्र नकोय आमचा संविधानावर विश्वास आहे असे भागवत म्हणाले.

लोकसंख्या नियंत्रणावर मोहन भागवत म्हणाले की, प्रत्येकाला दोन मुले असले पाहिजे असे माझे वक्तव्य आज छापून आले आहे. परंतु मी असे काही म्हणालो नाही. मी म्हणालो की लोकसंख्येसह स्रोतांचाही प्रश्न आहे. यासंदर्भात धोरण बनवले पाहिजे. एका दाम्पत्याला किती मुले असले पाहिजे यावर धोरण ठरले पाहिजे असेही भागवत म्हणाले.

आपली प्रतिक्रिया द्या