संभाजीनगर : ग्रामीण भागात मोठा शस्त्रसाठा जप्त, चार जण ताब्यात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । संभाजीनगर

गेल्या आठवड्यात संभाजीनगर शहरात धर्मांधांनी मोठी दंगल घडवून आणल्यानंतर पोलिसांनी ऑनलाईन शस्ञ खरेदी – विक्रीचा फंडा उघडकीस आणला. त्यानंतर संभाजीनगर शहरातील पोलिसांनी शहरात अनेक ठिकाणी तलवारी जप्त केल्या होत्या. शस्त्र खरेदी- विक्रीचे प्रकार बिडकीन पोलीस ठाणे हद्दीत होत आसल्याचे उघडकीस आल्यामुळे बिडकीन शहरासह परिसरात चांगलीच खळबळ उडाली आहे.

sambha00

बिडकीन पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पंडित सोनवणे यांना गुप्त सुत्रांकडून बिडकीन पोलीस ठाणे हद्दीमध्ये शस्ञ खरेदी-विक्री होत आसल्याची माहिती मिळाली आसता पोलीस अधिक्षक आरतीसिंह, उपविभागीय पोलीस अधिकारी स्वप्निल राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली हद्दीतील फारोळा, चितेगाव, केसापुरी, आलाना फॅक्टरी परिसर येथे धाडी टाकून बेकायदेशीररित्या तलवार, चाकू व इतर हत्यारे बनवण्याच्या साहित्यासह ४ जणांना ताब्यात घेतले. पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल आईटवार, दीपक देशमुख, राजू चव्हाण, सुनील सुरासे, तुळशीराम गगायकवाड, संतोष तोडकर, गणेश गगावने, कविता रगडे आदी पोलिसांनी यशस्वी कारवाई केली.

चार आरोपी आणि बारा शस्त्र

बिडकीन पोलिसांनी केलेल्या कारवाईत बबन लिंबाजी कुलाल (वय २३ रा.फारोळा), दत्ता महादु बोचकारी (वय २८ रा.चितेगाव), सतिष श्रीमंत सरोदे (वय २३ रा.केसापूरी) व संतोष करमसिंह टाक (वय ४५ रा.आलाना फॅक्टरी परिसर) या चौघांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून १ कुकरी, ५ तलवारी, ६ चाकू व हत्यारे तयार करण्याचे साहित्य असा एकूण १८ हजार १५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

बिडकीन पोलिसांसमोर मोठे आव्हान

दिल्ली, मुंबई औद्योगिक वसाहती बिडकीन नाव जागतीक नकाशावर झळकत असून रोजच हिंदुस्थानच्या कान्याकोपऱ्यातुन शेकडो कामगार बिडकीन शहरात धडकत आहे. संभाजीनगर जिल्ह्यातील सर्वात झपाट्याने वाढणारे शहर आशी बिडकीनची ओळख होत आसतानाच परिसरात शस्त्र विक्री होत असल्याचे उघड झाले आहे. ताब्यात घेतलेल्या आरोपींनी बिडकीन शहरात सुद्धा शस्त्र पुरवठा केला आहे का? केला आसेल तर कोणास किती प्रमाणात केला? हा तपास लावने आव्हानच आहे.

आरोपींची झाडाझडती घेतली असता त्यांच्याकडून धारदार शस्त्र मिळून आले आहेत, तसेच त्यांनी अजून कुणाला शस्त्र विकली आहेत का? त्याचा तपास सुरू आहेत.

– पंडित सोनवणे, सहाय्यक पोलीस निरीक्षक