वेब न्यूज – मानवाला प्रवेश बंद

सध्या पर्यटनाचा हंगाम बऱ्याच ठिकाणी जोरावर आहे. अशा वेळी पर्यटन हा विषय चर्चेला आला नसता तर नवल! सोशल मीडियावर सध्या अशा पाच ठिकाणांची जोरदार चर्चा चालू आहे, जिथे सामान्य लोकांना जायला पूर्णपणे बंदी आहे. 1) एरिया 51 – अमेरिकेच्या नेवाडा वाळवंटाच्या मध्यभागी असलेले एक गुप्त ठिकाण. अत्यंत कडेकोट बंदोबस्त असलेल्या या ठिकाणी इतरांना प्रवेश दिला जात नाही. इथे अमेरिकेची गुप्त प्रयोगशाळा असून तिथे एलियन्सवर प्रयोग केले जात असल्याचे दावे अनेक लोक करत असतात. अमेरिकेला एलियन्स आणि त्यांचे यान सापडले असून ते इथे कैद केले असल्याचा दावादेखील केला जातो. अधिकृतपणे मात्र हे हवाई दलाचे सुविधा पेंद्र आणि लष्करी चाचणीचे ठिकाण आहे. 2) स्नेक आयलंड – ब्राझीलच्या किनाऱयावर ‘इल्हा दा क्विमाडा ग्रांदे’ या नावाचे एक छोटेसे बेट आहे. हे ठिकाण सामान्यतः स्नेक आयलंड म्हणून ओळखले जाते. येथे संपूर्ण बेटावर मोठय़ा प्रमाणात अनेक विषारी साप आढळतात. सापांमुळे या ठिकाणचा समावेश धोकादायक ठिकाणी होतो. या दुर्मीळ प्रजातींच्या सापांचे रक्षण करण्यासाठी ब्राझील सरकारने लोकांना बेटावर जाण्यास बंदी घातली आहे. 3) चेर्नोबिल – सध्या युद्धग्रस्त असलेल्या युव्रेनमधील हे ठिकाण आहे. हे जगातील सगळय़ात निषिद्ध क्षेत्र मानले जाते. 1986 इथे अणुभट्टीमध्ये झालेल्या अपघातानंतर प्रचंड किरणोत्सर्ग झाला होता. त्याचा दुष्प्रभाव आजही या क्षेत्रात कायम आहे. जगातील सर्वात धोकादायक ठिकाणांपैकी हे एक ठिकाण आहे. 4) सेंटिनेल बेट – भारताच्या उत्तर सेंटिनेल बेटावर सेंटिनेल बेटाबाहेरील लोकांना सक्त मनाई आहे. अंदमानच्या नॉर्थ सेंटिनेल बेटावर नेग्रिटो समुदायाचे लोक राहतात. त्यांचा बाह्य जगाशी कोणताही संपर्क नसतो आणि ते पूर्णपणे एकटे राहतात. 5) स्वालबार्ड ग्लोबल सीड व्हॉल्ट – नॉर्वेजियन आर्क्टिकमध्ये वसलेल्या या ठिकाणी भविष्यातील संकटांचा विचार करून जगभरातील वनस्पतींच्या बियांचे जतन करण्यात आले आहे. जैवविविधतेचे संरक्षण हा यामागचा प्रमुख उद्देश आहे.