देशी आणि काबुली चण्यावर वेबिनारचे आयोजन

418
Desi Kabuli chana

हिंदुस्थानातील डाळींची विक्री आणि उद्योगातील प्रमुख संस्था असलेल्या हिंदुस्थानची डाळी आणि कडधान्य संघटनेच्या (आयपीजीए) वतीने 14 ऑगस्ट 2020, शुक्रवारी संध्याकाळी 5 वाजता ‘देशी आणि काबुली चणा’ या विषयावर ‘द आयपीजीए ज्ञान मालिका’ या मालिकेतील दुस-या वेबिनारचे आयोजन करण्यात आले आहे.

देशातील आणि जगभरातील केवळ डाळींच्या क्षेत्रातील विविध विषयांवर चर्चा व विश्लेषण करण्यासाठी ‘द आयपीजीए ज्ञान मालिका’ ही वेबिनारची मालिका गेल्या महिन्यात सुरू करण्यात आली.

आयपीजीएने 14 ऑगस्टला होणा-या दुसऱ्या वेबिनारसाठी चणे हा विषय निवडण्यामागे दोन कारणं आहेत. एक बाजारात आलेले रबी हंगामातील पीक आणि दुसरे कारण म्हणजे पंतप्रधान गरीब कल्याण योजना (PMGKY) या योजनेची मुदत नोव्हेंबर 2020 पर्यंत वाढवण्याचे पंतप्रधानांनी जाहीर केले आहे आणि या योजनेअंतर्गत देशातील जवळ-जवळ 18 कोटी घरांमध्ये 1 किलो चणाडाळ मोफत देण्यात येणार आहे.

देशात 2018-19 या वर्षात 9.94 दशलक्ष टन डाळीचे उत्पादन करण्यात आले आहे. तिस-या अंदाजपत्रकानुसार 2019-20 या वर्षात 10.90 दशलक्ष टन उत्पादन होईल अशी अपेक्षा आहे. PMGKY ला दिलेल्या मुदतवाढीमुळे NAFED हमीभावत शेतक-यांकडून मोठ्या प्रमाणात चणा विकत घेईल आणि त्यानंतर येणा-या सणासुदीमुळंही चण्याला बाजारात मोठी मागणी असेल. देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील चणा डाळीची किंमत ठरवण्यात वरचे सगळे घटक महत्त्वाची भूमिका बजावतील.

देशी व काबुली चणा या विषयावर 14 ऑगस्टला होणा-या वेबिनारमध्ये खाली दिलेल्या सर्व विषयांवर सखोल चर्चा होणार आहे: चण्याचे उत्पादन: हिंदुस्थान आणि इतर महत्त्वाची मूळ ठिकाणं. NAFED कडून होणारी खरेदी, साठवण आणि विक्रीचे धोरण, PMGKY अंतर्गत मोफत चणा वितरणाचे संदर्भ, आंतरराष्ट्रीय आणि भारतीय बाजारातील चण्याची किंमत, चणा पुरवठा आणि मागणी ट्रेंड्स, हिंदुस्थानचे महत्त्वाचे धोरण आणि किंमती, काबुली चणा- उत्पादन आणि निर्यात.

चणा या विषयावर 14 ऑगस्टला होणा-या आयपीजीए ज्ञान मालिकेअंतर्गत वेबिनारसाठी नोंदणी सुरू आहे, ही लिंक वापरून नोंदणी करू शकता: https://forms.gle/6Ug1yJqwsnXLmBL77

आपली प्रतिक्रिया द्या