साप्ताहिक राशिभविष्य – रविवार 1 ऑक्टोबर ते शनिवार 7 ऑक्टोबर 2023

>> नीलिमा प्रधान

मेष :- अहंकार दूर ठेवा
मेषेच्या षष्ठेशात बुध, पंचमेषात शुक्र, सप्तमेषात मंगळ. चोहोबाजूने दडपण येईल. शत्रूला कमी लेखू नका. नोकरीत तणाव, वाद उद्भवतील. धंद्यात हिशेब सांभाळा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात डावपेच विफल ठरवण्याचा प्रयत्न होईल. रागावर नियंत्रण ठेवल्यास समस्या कमी होतील. अहंकारयुक्त भाषा घातक ठरेल.
शुभ दिनांक : 1, 6

वृषभ :- यश लाभेल
वृषभेच्या पंचमेषात बुध, चतुर्थात शुक्र, षष्ठेशात मंगळ. गोड बोलून शह देण्यात हुशारी आहे. नोकरीधंद्यात समाधानपूर्वक यश लाभेल. जवळच्या व्यक्तीला मदत करण्यात अडचणी येतील. राजकीय, सामाजिक क्षेत्रात डावपेच नव्याने शिकाल. वरिष्ठ तुमच्या कार्याचे कौतुक करतील. मेहनतीने यश खेचता येईल.
शुभ दिनांक: 6, 7

मिथुन :- कामाकडे लक्ष द्या
मिथुनेच्या सुखस्थानात बुध, पराक्रमात शुक्र, पंचमेषात मंगळ. क्षुल्लक समस्या त्रासदायक ठरतील. कुणालाही गृहीत धरू नका. नोकरीत कामाकडे लक्ष द्या. धंद्यात हलगर्जीपणा नको. राजकीय, सामाजिक क्षेत्रात वरिष्ठ प्रामाणिकपणाची मागणी करतील. कायद्याच्या चौकटीत राहून काम करा. तत्परता ठेवा.
शुभ दिनांक : 1, 2

कर्क :- संयम ठेवा
कर्केच्या पराक्रमात बुध, धनेशात शुक्र, सुखस्थानात मंगळ. संयम ठेवल्यास कामे मार्गी लागतील. प्रवासात काळजी घ्या. राग आवरा. नोकरीत वर्चस्व राहील. धंद्यात लाभ होईल. चर्चा यशस्वी ठरेल. थकबाकी मिळवा. नवीन परिचय उपयुक्त ठरेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रातील कामे करून घ्या. प्रतिमा उजळेल.
शुभ दिनांक : 1, 3

सिंह :- प्रत्येक दिवस महत्त्वाचा
सिंहेच्या धनेषात बुध, स्वराशीत शुक्र, पराक्रमात मंगळ. प्रत्येक दिवस महत्त्वाचा ठरेल. आर्थिक समस्या सोडवा. नोकरीत बढती होईल. धंद्यात सुधारणा होईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात स्वतच्या कार्यावर अधिक भर द्या. दिग्गज व्यक्तींचा परिचय होईल. स्पर्धेत अपेक्षित यश मिळेल. कौटुंबिक कामे होतील.
शुभ दिनांक : 5, 6

कन्या :- अनाठायी खर्च टाळा
स्वराशीत बुध, कन्येच्या व्ययेषात शुक्र, धनेषात मंगळ. प्रकृतीची काळजी घ्या. अनाठायी खर्च टाळा. मैत्रीत, नात्यात गैरसमज होतील. नोकरीत सौम्य धोरण ठेवा. धंद्यात गोड बोला पण भावनेच्या आहारी जाउढ नका. राजकीय, सामाजिक क्षेत्रात शत्रू तुमच्याकडील गुपित काढून घेण्याचा प्रयत्न करतील.
शुभ दिनांक: 6, 7

तूळ :- रागावर नियंत्रण ठेवा
तुलेच्या व्ययेषात बुध, एकादशात शुक्र, स्वराशीत मंगळ. अतिशयोक्ती, वाद, राग यावर नियंत्रण ठेवा. यश मिळवा. नोकरीत सतर्क रहा. धंद्यात चूक नको. राजकीय, सामाजिक क्षेत्रात रागाच्या भरात बोलताना नियंत्रण ठेवा. शब्द समस्या निर्माण करतील. कायदा पाळा. प्रवासात सावध रहा. कुटुंबीयांची चिंता वाटेल.
शुभ दिनांक : 1, 2

वृश्चिक :- स्पर्धा वाढेल
वृश्चिकेच्या एकादशात बुध, दशमेषात शुक्र, व्ययेषात मंगळ. राग वाढवणारे प्रसंग वारंवार येतील. सावध रहा. नोकरीत कामाचे कौतुक झाले तरी स्पर्धा वाढेल. धंद्यात लाभ होईल. कामाविषयी चर्चा होईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात वर्चस्व वाढेल. संयमी भूमिका यश देईल. दर्जेदार परिचयाने प्रतिमा उजळेल.
शुभ दिनांक : 1, 4

धनु :- योग्य निर्णय घ्याल
धनुच्या दशमेषात बुध, भाग्येषात शुक्र, एकादशात मंगळ. तुमच्या स्वभावाचा गैरफायदा लोक लक्षात आल्याने योग्य निर्णय घ्याल. तुमच्या क्षेत्रात अग्रेसर राहाल. नोकरी, धंद्यात लाभ होईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात ज्ञानात भर पडेल. मानसन्मान मिळेल. लोकसंग्रह वाढेल. स्पर्धेत यश मिळेल.
शुभ दिनांक : 1, 6

मकर :- कर्तव्यदक्ष रहा
मकरेच्या भाग्येषात बुध, अष्टमेषात शुक्र, दशमेषात मंगळ. साडेसाती सुरू आहे. स्पर्धेत पुढे जाण्यासाठी योग्य प्रयत्न सुरू ठेवा. नोकरीत संधीचे सोने करा. आरोग्याची काळजी घ्या. पैसे जपा. धंद्यात वाढ होईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात कर्तव्यदक्ष रहा. भावनेच्य आहारी न जाता कामे करा. नाराजी टाळा.
शुभ दिनांक : 3, 4

कुंभ :- सावधपणे वक्तव्य करा
कुंभेच्या अष्टमेषात बुध, सप्तमेषात शुक्र, भाग्येषात मंगळ. साडेसातीचा विसर पडू देऊ नका. कायदा पाळा. वक्तव्य, मुद्दे मांडताना काळजी घ्या. अतिशयोक्ती नको. कर्तव्य व भावना यांचा योग्य मेळ घाला. नोकरीत चूक टाळा. धंद्या नम्र रहा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात अपमानास्पद वागणूक मिळेल.
शुभ दिनांक : 1, 6

मीन :- दुखापत टाळा
मीनेच्या सप्तमेषात बुध, षष्ठेशात शुक्र, अष्टमेषात मंगळ. प्रकृतीची काळजी घ्या. दुखापत टाळा. नोकरीत प्रभाव वाढेल. सहकारी, मित्र द्वेष करतील. धंद्यात लाभ होईल. मोह टाळा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात योजनांवर लक्ष द्या. सहकारी, नेते यांच्यासमवेत कठीण कामे करून घ्या. नाराजी टाळा.
शुभ दिनांक : 3, 4