मेष – चर्चा उपयुक्त ठरेल
मेषेच्या भाग्येषात सूर्य, शुक्र गुरू प्रतियुती. मैत्रीच्या भाषेतून केलेली चर्चा अधिक उपयुक्त ठरेल. अधिकारांनी पुढे जाता येणार नाही. नोकरीत संयम ठेवा. धंद्यात वाढ होईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात तटस्थपणा ठेवा. परिस्थितीचे अवलोकन करा. कोणावरही टीका करू नका. स्पर्धा कठीण आहे. प्रकृतीची काळजी घ्या. शुभ दिनांक – 15, 16
वृषभ – नात्यात तणाव येईल
वृषभेच्या अष्टमेषात सूर्य, चंद्र, मंगळ लाभ योग. सप्ताहाच्या सुरूवातीला कामे करण्याचा प्रयत्न करा. अट्टहास नको. मैत्रीत, नात्यात तणाव होईल. गैरसमज नको. धंद्यात नुकसान टाळा. नोकरीतील महत्त्वाची कामे रेंगाळत ठेवू नका. राजकीय, सामाजिक क्षेत्रात संमिश्र वातावरण राहील. आग्रही भूमिका नको. शुभ दिनांक – 11, 12
मिथुन – प्रवासात घाई नको
मिथुनेच्या सप्तमेषात सूर्य, चंद्र बुध युती. देवदीपावलीपासून कार्याला गती मिळेल. अडचणी कमी होतील. शत्रुत्व कमी करण्याचा प्रयत्न करा. नोकरीधंद्यात सावधपणे निर्णय घ्या. प्रवासात घाई नको. राजकीय, सामाजिक क्षेत्रात क्षुल्लक आरोपांना उत्तरे देऊ नका. संयमी भूमिका महत्त्वाची. शुभ दिनांक – 13, 14
कर्क – महत्त्वाची कामे करा
कर्केच्या षष्ठेशात सूर्य, चंद्र, गुरू त्रिकोणयोग. सप्ताहाच्या सुरुवातीला महत्त्वाची कामे करा. गुप्त कारवायांना कमी लेखू नका. नोकरीच्या ठिकाणी दुर्लक्ष नको. धंद्यात अरेरावी नुकसानकारक. राजकीय, सामाजिक क्षेत्रात वरीष्ठांच्या विरोधात जाऊ नका. कायदेशीर वक्तव्य करा. स्पर्धा कठीण आहे. शुभ दिनांक – 11, 16
सिंह – लोकप्रियता वाढेल
सिंहेच्या पंचमेषात सूर्य, चंद्र, बुध युती. सप्ताहाच्या शेवटी गैरसमज, वाद होतील देवदिपावली दिवशी नवीन विषयावर लक्ष केंद्रित करा. नोकरीच्या ठिकाणी बढतीची शक्यता. धंद्यात वसुलीचा प्रयत्न करा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात लोकप्रियता वाढेल. कायद्याच्या कक्षेत राहून काम करा. दगदग होईल. शुभ दिनांक – 10, 13
कन्या – प्रत्येक दिवस उत्साहाचा
कन्येच्या सुखस्थानात सूर्य, बुध, शुक्र लाभयोग. प्रत्येक दिवस उत्साहवर्धक ठरेल. किचकट कामे करून घ्या. नोकरीत कामाचे कौतुक होईल. धंद्यात लाभ होईल. थकबाकी मिळवा. नवीन परिचय तुमच्या कार्याला उपयुक्त ठरतील. राजकीय, सामाजिक क्षेत्रात नवे मुद्दे मांडता येतील. कामात यश मिळेल. शुभ दिनांक – 10,11
तूळ – परदेशात जाण्याची संधी
तुळेच्या पराक्रमात सूर्य, बुध, गुरू लाभयोग. किचकट कामे करून घ्या. कामे रेंगाळत ठेवू नका. नोकरीत बढती, बदली शक्य. परदेशात जाण्याची संधी. धंद्यात नवे धोरण ठेवता येईल. धंद्यात विस्तार होईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात जनसंग्रह वाढवा. स्वतचे स्थान मजबूत करा. घरातील व्यवहार पूर्ण करा. शुभ दिनांक – 13, 14
वृश्चिक – प्रेरणादायक वातावरण
वृश्चिकेच्या धनेषात सूर्य, चंद्र, बुध युती. तुमच्या क्षेत्रातील अंदाज बरोबर येतील. प्रेरणादायक वातावरण राहील. नोकरीतील तणाव कमी होईल. धंद्याला कलाटणी मिळेल. अडलेले काम करता येईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रातील तणाव, चिंता कमी करण्याची संधी मिळेल. मैत्रीच्या भावनेने वागा बोला. लाभ होईल. शुभ दिनांक – 14, 15
धनु – ध्येयावर लक्ष ठेवा
स्वराशीत सूर्य, चंद्र, शुक्र लाभयोग. मनावर दडपण येईल. नोकरीतील तणाव कमी होईल. धंद्यातील वसुली करा. चर्चा, करार करण्यात यश मिळवा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात संतापजनक घटना घडेल. जवळच्या व्यक्ती मदत करतील. आरोपांना उत्तर देण्यापेक्षा ध्येयावर लक्ष ठेवा. कामातून श्रेष्ठत्व दर्शवा. शुभ दिनांक – 15, 16
मकर – संमिश्र स्वरूपाचा काळ
मकरेच्या व्ययेषात सूर्य, चंद्र, शुक्र लाभयोग. संमिश्र स्वरूपाचे वातावरण राहील. उतावळेपणा न करता प्रसंगानुरूप निर्णय घ्या. सौम्य धोरण ठेवा. नोकरीतील कठीण कामे करून घ्या. धंद्यात वाद वाढवू नका. वसुली करा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात स्पष्ट मत दर्शवण्याची घाई नको. अहंकार दूर ठेवा. शुभ दिनांक – 10, 11
कुंभ – सावधगिरी बाळगा
कुंभेच्या भाग्येषात सूर्य, बुध, शुक्र लाभयोग. सप्ताहाच्या शेवटी तणावग्रस्त वातावरण राहील. तुमचा प्रभाव टिकेल. नोकरीच्या ठिकाणी सावध रहा. धंद्यात नुकसान टाळा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात अनेक कामे मार्गी लावता येतील. दिग्गज व्यक्तींचा परिचय होईल. तुमच्या कार्याचे कौतुक होईल. स्पर्धेत प्रगती होईल. शुभ दिनांक – 10, 13
मीन – नोकरीत वर्चस्व राहील
मीनेच्या दशमेषात सूर्य, शुक्र, गुरू प्रतियुती. नात्यातील, मैत्रीतील गैरसमज दूर होतील. नोकरीत वर्चस्व राहील. चांगला बदल होईल धंद्यात नवे काम मिळेल. फसगत टाळा. मोह नको. नवीन ओळख नीट पारखून घ्या. राजकीय, सामाजिक क्षेत्रात योजनांना गतिमान कराल. भेटीत, चर्चेत यश मिळेल. शुभ दिनांक – 13, 14