साप्ताहिक राशिभविष्य – रविवार 10 सप्टेंबर ते शनिवार 16 सप्टेंबर 2023

>> नीलिमा प्रधान

मेष – संयम बाळगा

सूर्य, हर्षल त्रिकोणयोग, चंद्र, बुध युती. जवळच्या व्यक्ती तुमच्याबद्दल अफवा पसरवण्याचा प्रयत्न करतील. नोकरीत वरिष्ठ तुमच्या बाजूने निर्णय घेतील. धंद्यात खर्च होईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात प्रतिष्ठा वाढेल. नवे डावपेच महत्त्वाचे ठरतील. सहकारी, नेते खुसपट काढण्याचा प्रयत्न करतील. संयम बाळगा. शुभ दिनांक : 10, 11

वृषभ – यश लाभेल

चंद्र, शुक्र प्रतियुती, चंद्र, मंगळ लाभयोग. प्रयत्नाने प्रत्येक दिवशी यश लाभेल. नोकरीधंद्यात वाढ होईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात वरिष्ठांच्या मतानुसार वागा. चर्चेत यश मिळेल. नवीन परिचय प्रेरणदायी ठरेल. वसुली करा. नम्रता व सामंजस्यपणा महत्त्वाचा ठरेल. स्पर्धेत प्रयत्न करा. कौटुंबिक कामे होतील. शुभ दिनांक: 10, 11

मिथुन – महत्त्वाची कामे करा

चंद्र, शुक्र युती, सूर्य, हर्षल त्रिकोणयोग. महत्त्वाची कामे करून घ्या. रागावर नियंत्रण ठेवा. थकबाकी वसूल करा. नोकरीधंद्यात प्रगती होईल. बदल होईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात दिग्गज व्यक्तींचे मार्गदर्शन लाभेल. मानसन्मान मिळेल. पद मिळेल. जुने गैरसमज दूर करा. किचकट प्रश्न सोडवा. शुभ दिनांक: 11, 12

कर्क – ताणतणाव वाढवू नका

चंद्र, बुध युती, चंद्र, गुरू त्रिकोणयोग. क्षुल्लक ताणतणाव वाढवू नका. कोणतेही कठीण काम मार्गी लावा. नोकरीत बढती, बदली शक्य. वसुली करा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात प्रतिष्ठा वाढवणारे प्रसंग येतील. पद, अधिकार मिळेल. जुना वाद, गैरसमज संपवा. नियोजनबद्ध कार्यरचना करा. मोठे यश मिळवा. शुभ दिनांक:11,13

सिंह – सावध रहा

चंद्र, बुध युती, सूर्य, हर्षल त्रिकोणयोग. सप्ताहाच्या सुरुवातीला कठीण प्रश्न सोडवावा लागेल. डोळ्यांची काळजी घ्या. धंद्यात, नोकरीत प्रगती होईल. वसुली, थकबाकी प्रेमाने करा. मोह टाळा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात महत्त्व वाढेल. भावनेच्या आहारी जाऊ नका. नवीन मैत्री,  नवीन परिचयाबाबत सावध रहा. शुभ दिनांक : 15, 16

कन्या – अहंकार दूर ठेवा 

चंद्र, शुक्र युती, चंद्र, नेपच्युन त्रिकोणयोग. क्षेत्र कोणतेही असो न बोलता प्रभाव दाखवा. अहंकाराने समस्या वाढेल. नोकरीधंदा टिकवा. गोड बोलून कार्यभाग साधा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात तटस्थ भूमिका घ्या. वादग्रस्त विधान टाळा. नवीन परिचय प्रेरणादायक ठरेल. मैत्रीतून लाभ होईल. शुभ दिनांक: 10, 11

तूळ – रागावर ताबा ठेवा 

चंद्र, बुध युती, सूर्य, हर्षल त्रिकोणयोग. महत्त्वाची, कठीण कामे लवकर करा. प्रेमाने मन जिंका. रागावर ताबा ठेवा. वाहनाचा वेग नियंत्रणात ठेवा. नोकरीधंद्यात युक्तीने बोला. प्रेमाने वागा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात गुप्त कारवाया होतील. तुमची प्रतिष्ठा, पद वाढेल. नम्रता, संयम यावर यश मिळवाल. शुभ दिनांक : 10, 11

वृश्चिक – प्रत्येक दिवस यशस्वी

चंद्र, बुध युती, चंद्र, गुरू लाभयोग. प्रत्येक दिवस यशस्वी करू शकाल. नोकरीधंद्यात सुधारणा होईल. वाढ, वसुली शक्य होईल. नवीन परिचय उत्साहवर्धक ठरतील. राजकीय, सामाजिक क्षेत्रात कार्याचा विस्तार होईल. परकीय व्यक्तीसोबतच्या करारात यश मिळेल. गुप्त कारवायांवर नजर ठेवा. शुभ दिनांक : 11, 12

धनु – प्रकृतीची काळजी घ्या 

रवि, हर्षल त्रिकोणयोग, चंद्र, बुध युती. सप्ताहाच्या सुरूवातीला प्रकृतीचा त्रास होईल. व्यसन, खाण्याची काळजी घ्या. नोकरीत वरिष्ठांना तुमचा प्रभाव दिसेल. धंद्यात वाढ होईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात कार्याचा, डावपेचांचा ठसा उमटवाल. अधिकारप्राप्ती होईल. कुटुंबात नाराजी. नवीन परिचयापासून सावध रहा. शुभ दिनांक : 13, 16

मकर – कायदा पाळा

चंद्र, शुक्र युती, चंद्र, नेपच्युन त्रिकोणयोग. कोणतेही क्aाढाम करताना अहंकारयुक्त भाषा नको. नोकरी, व्यवसायातील अडचणी गोड बोलून दूर करा. कायद्याच्या विरोधात जाऊ नका.  राजकीय, सामाजिक क्षेत्रात मानपानाचा विचार न करता जनतेच्या कार्यात सहभागी व्हा. लोकसंग्रह वाढवा. कठोर शब्द नको. शुभ दिनांक : 11, 12

कुंभ – वर्चस्व वाढेल 

चंद्र, बुध युती, सूर्य, हर्षल त्रिकोणयोग. कोणतेही काम रेंगाळत ठेऊ नका. नोकरीत अडचणींवर मात कराल. धंद्यात गोड बोला. भागीदार अडचणी वाढवेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात वर्चस्व वाढेल, मुद्दे प्रभावी ठरतील. स्पर्धेत पुढे जाल. गुप्त कारवायांना कमी लेखू नका. संसारात खर्च होईल. शुभ दिनांक : 13, 14

मीन – कार्यावर भर द्या

चंद्र, मंगळ युती, चंद्र, शुक्र लाभयोग. प्रगतीची संधी हुकण्याची शक्यता पण निराश न होता कार्यावर भर द्या. अडचणी येतील. नवीन परिचय उत्साहवर्धक व प्रेरणादायी ठरतील. राजकीय, सामाजिक क्षेत्रात लोकांच्या हिताच्या योजना करा. कायद्याच्या कक्षेत राहून काम करा. स्पर्धा कठीण वाटेल. शुभ दिनांक : 10, 11