साप्ताहिक राशिभविष्य – रविवार 11 फेब्रुवारी ते शनिवार 17 फेब्रुवारी 2024

>> नीलिमा प्रधान

मेष – क्षुल्लक तणाव जाणवेल

मेषेच्या दशमेषात शुक्र, एकादशात सूर्य. सप्ताहाच्या सुरुवातीला क्षुल्लक ताणतणाव असेल, मात्र मार्ग मिळेल.नोकरीत बढती, बदली होईल. उन्नतीही लाभेल. धंद्यात जम बसेल. नवे काम शोधा. राजकीय, सामाजिक क्षेत्रातील किचकट प्रश्न सोडवाल. अधिकार, पद, प्रतिष्ठा वाढेल. स्पर्धेत यश मिळेल. जनसंग्रह वाढवा. योजनांना न्याय द्या.

शुभ दिनांक : 14, 15

वृषभ – संयमाने वागा

वृषभेच्या भाग्येषात शुक्र, दशमेषात सूर्य, सप्ताहाच्या मध्यावर संयमाने वागा. अनेक कामे करून घेता येतील. परिचयातून उत्साहवर्धक मार्ग मिळेल. नोकरीधंद्यातील समस्या सोडवा. वसुली करा. नवे काम मिळेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. चर्चेत यश येईल. अधिकार लाभतील. जुने गैरसमज दूर करता येतील. घरातील ताण कमी होईल.

शुभ दिनांक : 11, 12

मिथुन – प्रकृतीची काळजी घ्या

मिथुनेच्या अष्टमेषात शुक्र, भाग्येषात सूर्य. रेंगाळलेल्या कामांना गतिमान करता येईल. कोणत्याही क्षेत्रात गैरसमज वाढू देऊ नका. प्रकृतीची काळजी घ्या. प्रवासात सावध रहा. नोकरीध्ंाद्यात कायदा पाळा. भावनेच्या आहारी जाऊन कोणताही निर्णय घेऊ नका. राजकीय, समाजिक क्षेत्रात गुप्त कारवाया लक्षात येतील. रागावर नियंत्रण ठेवा.

शुभ दिनांक : 11, 12

कर्क – कामात सावध रहा

कर्केच्या सप्तमेषात शुक्र, अष्टमात सूर्य. रविवारी संयमी कृती करा. शब्द जपून वापरा. नोकरीच्या कामात सावध रहा. सतर्क रहा. धंद्यात फायदा होईल. कुठेही कायदा मोडू नका. वसुली करा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात तुमच्या विरोधात भाष्य केले जाईल. आरोप व टीका होईल. कोणतेही मुद्दे जपून मांडा. समस्या वाढू देऊ नका. संसारात संमिश्र वातावरण राहील.

शुभ दिनांक : 13, 14

सिंह – गैरसमज होतील

सिंहेच्या षष्ठात शुक्र, सप्तमात सूर्य. सप्ताहाच्या सुरुवातीला तणाव, वाद, गैरसमज होतील. नोकरीत दगदग, धावपळ होईल. धंद्यात सौम्य शब्दात बोला. यांत्रिक बिघाडावर खर्च होईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रातील त्रुटी भरून काढता येतील. नवीन व्यक्तीवर जास्त विश्वास ठेवू नका. कौटुंबिक प्रश्नावर क्षुल्लक तणाव जाणवेल.

शुभ दिनांक : 15, 16

कन्या – संयमी कृती करा

कन्येच्या पंचमेषात शुक्र, षष्ठात सूर्य. क्षेत्र कोणतेही असो, गुप्त कारवाया वाढतील. नजर ठेवा. संयमी कृती असू द्या. सर्वत्र कायदा पाळा. नोकरीच्या ठिकाणी गैरसमज होतील. धंद्यातील व्यवहार जपून करा. कराराची घाई करू नका. राजकीय, सामाजिक क्षेत्रात मोठी जबाबदारी स्वीकारावी लागेल. प्रसंगावधान ठेवा. कोणत्याही समस्येत अडकू नका.

शुभ दिनांक : 13, 17

तूळ – कामात सतर्क रहा

तुळेच्या सुखस्थानात शुक्र, पंचमेषात सूर्य. कोणतेही काम करताना घाई नको. वाहन जपून चालवा. दुखापत टाळा. नोकरीतील कामात सतर्क रहा. धंद्यात वाढ होईल. मात्र दगदगही होईल. वसुलीचा प्रयत्न करा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात कोणताही मुद्दा मांडताना योग्य संधीची वाट पहा. वरिष्ठांकडून मोठे आश्वासन मिळेल.

शुभ दिनांक : 11, 14

वृश्चिक – आत्मविश्वास वाढेल

वृश्चिकेच्या पराक्रमात शुक्र, चतुर्थात सूर्य. उत्साह, आत्मविश्वास वाढेल. मुद्दे मांडताना क्षुल्लक चूकसुद्धा तणाव निर्माण करेल. नोकरीधंद्यात मेहनत, प्रयत्न, बुद्धिमत्तेचा योग्य वापर करा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात परस्परविरोधी घटना घडतील. नवीन परिचय फायद्याचा ठरेल. तुमच्या चांगल्या कामावर टीकात्मक चर्चा होईल.

शुभ दिनांक : 12, 17

धनु – परिचय फायदेशीर

धनुच्या धनेषात शुक्र, पराक्रमात सूर्य. अनेक समस्या सोडवण्याचा प्रयत्न करा. यश मिळेल. नोकरीधंद्यात प्रगती व लाभ होईल. दिग्गज व्यक्तींचा परिचय फायदेशीर ठरेल. वसुली करा. नवे कंत्राट मिळेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रातील गैरसमज, तणाव दूर सारून वेगाने पुढे जाता येईल. बुद्धिमत्तेचा वापर करा. समस्या रेंगाळत ठेवू नका.

शुभ दिनांक : 12, 13

मकर – कामाचे नियोजन करा

स्वराशीत शुक्र, मकरेच्या धनेषात सूर्य. प्रत्येक दिवस यशस्वी करा. कामांची पद्धतशीर मांडणी करा. दौऱयात, भेटीत यश मिळेल. आत्मविश्वास वाढवणाऱया घटना घडतील. नोकरीत जम बसेल. धंद्यात वाढ होईल. थकबाकी मिळवा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात वर्चस्व वाढवता येईल. लोकप्रियता लाभेल. वाद वाढवू नका. स्पर्धेत पुढे जाल. घरगुती कामे होतील.

शुभ दिनांक : 13, 14

कुंभ – रागावर ताबा ठेवा

कुंभेच्या व्ययेषात शुक्र, स्वराशीत सूर्य. भावनाविवश न होता कामे करा. रागावर ताबा ठेवा. महत्त्वाची वस्तू सांभाळा. नोकरीतील समस्या कमी हातील. मैत्रीत, नात्यात कामे वाढतील. वाद टाळा. धंद्यात खर्च, नुकसान टाळता येईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात तुमचा अंदाज बरोबर येईल. तुमचे मुद्दे योग्य ठरतील. घरात नाराजी होईल.

शुभ दिनांक : 13, 14

मीन – काळवेळेचे भान ठेवा

मीनेच्या एकादशात शुक्र, व्ययेषात सूर्य. फाजील आत्मविश्वास धोकादायक ठरेल. साडेसातीचे पर्व सुरू आहे. कोणालाही आश्वासन देताना काळवेळेचे भान ठेवा. धंद्यात वाढ होईल. नोकरी टिकवा. कायदा मोडू नका. राजकीय, सामाजिक क्षेत्रातील परिस्थितीचा अभ्यास करा. प्रतिक्रिया देणे टाळा. वरिष्ठांना कमी लेखू नका. स्पर्धा कठीण आहे.

शुभ दिनांक : 14, 15