साप्ताहिक राशिभविष्य – रविवार 14 जानेवारी ते शनिवार 20 जानेवारी 2024

>> नीलिमा प्रधान

कामांना गती प्राप्त होईल

मेषच्या दशमेषात सूर्य, भाग्येषात शुक्र. अनेक कामांत गती प्राप्त होईल. दिग्गज व्यक्तींचा सहवास ज्ञानात भर टाकणारा ठरेल. नोकरीत प्रगती, लाभ होईल. धंद्यात सुधारणा होईल. वाढ होईल. नवे भागीदार मिळतील. वसुली करा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात उत्साह, आत्मविश्वास वाढवणारी चर्चा, नवे डावपेच टाकता येतील. खरेदी-विक्रीत लाभ होईल. शुभ दिनांक – 15, 16

फसगत टाळा

वृषभेच्या भाग्येषात सूर्य, अष्टमेषात शुक्र. सप्ताहाच्या सुरुवातीला कामे करून घ्या. नोकरीतील तणाव कमी होईल. धंद्यात फसगत टाळा. विचारपूर्वक बोला. राजकीय, सामाजिक क्षेत्रात कोणतेही वक्तव्य कायद्याला धरून करा. तुमचा संताप वाढेल असे वक्तव्य विरोधकांकडून केले जाईल. गुप्त कारवाया वाढतील. प्रवासात सावध रहा. घरात खर्च, तणाव राहील. शुभ दिनांक – 16, 17

प्रत्येक दिवस उत्साहवर्धक

मिथुनेच्या अष्टमेषात सूर्य, षष्ठेषात शुक्र. प्रत्येक दिवस उत्साहवर्धक ठरेल. अहंकार दूर ठेवा. नोकरीत कामाचे कौतुक होईल. बदलीची शक्यता आहे. धंद्यात वाढ होइल. वसुली करा. नवा भागीदार, सल्लागार मिळेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात दबाव राहील. कामासाठी दगदग होईल. अनेक परिचय उपयुक्त ठरतील. खरेदी-विक्रीत लाभ होईल.

शुभ दिनांक – 18, 19

तडजोड करावी लागेल

कर्केच्या सप्तमेषात सूर्य, षष्ठेशात शुक्र. सप्ताहाच्या सुरुवातीला तडजोड करावी लागेल. व्यवहार व भावना यांची योग्य सांगड घालणे गरजेचे ठरेल. नोकरीत क्षुल्लक गैरसमज होतील. धंद्यात बेफिकिरीने वागू नका. राजकीय, सामाजिक क्षेत्रात गुप्त कारवायांना कमी लेखू नका. मैत्रीत, नात्यांत गैरसमज होतील. कौटुंबिक वाटाघाटीचा प्रश्न सुटणे कठीण. शुभ दिनांक – 12, 13

प्रेरणादायक संधी मिळेल

सिंहेच्या षष्ठेशात सूर्य, पंचमेषात शुक्र. कला, क्रीडा साहित्यात प्रेरणादायक संधी. मोठेपणाच्या आहारी जाऊ नका. जनतेचे प्रेम मिळेल. नोकरीत कामाचा व्याप वाढेल. वरिष्ठांना कमी समजू नका. धंद्याला चांगली कलाटणी मिळेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात चौफेर दबाव राहील. मैत्रीच्या नात्याने प्रश्न सोडवा. कायदा पाळा. कुटुंबात चिंता राहील. शुभ दिनांक – 18, 19

शब्द जपून वापरा

कन्येच्या पंचमेषात सूर्य, सुखस्थानात शुक्र. खाण्याची काळजी घ्या. प्रवासात सावध रहा. नात्यात शब्द जपून वापरा. नोकरीत धावपळ होईल. धंद्यात मोहाला बळी पडू नका. राजकीय, सामाजिक क्षेत्रात गैरसमज, तणाव होतील असे बोलणे टाळा. थट्टामस्करीतून वाद उद्भवतील. महत्त्वाच्या वस्तू सांभाळा. कायद्याचे पालन करा. शुभ दिनांक – 16, 17

तारतम्य ठेवा

तुळेच्या सुखस्थानात सूर्य, पराक्रमात शुक्र. तारतम्य ठेवून वागल्यास प्रत्येक दिवस यशदायी ठरेल. तुमच्या क्षेत्रात प्रेरणादायक वातावरण राहील. नोकरीत सतर्क रहा. धंद्यात वसुली करा. लाभ, वाढ होईल. कर्जाचे काम करताना घाई नको. राजकीय, सामाजिक क्षेत्रात वरिष्ठ मोठे आश्वासन देतील. नवीन परिचय आत्मविश्वास वाढवेल. शुभ दिनांक – 18, 19

खरेदीविक्रीत लाभ

वृश्चिकेच्या पराक्रमात सूर्य, धनेषात शुक्र. सप्ताहाच्या सुरुवातीला कठीण कामे करा. खरेदी-विक्रीत लाभ होईल. नोकरीत चांगला बदल होईल. स्पर्धा करणारे वाढतील. राजकीय, सामाजिक क्षेत्रात तणावाला दूर करून तुमचे मत योग्य पद्धतीने मांडता येईल. जुने, नवे परिचय नव्याने बांधले जातील. खर्चावर बंधन घालणे कठीण. शुभ दिनांक – 17, 18

प्रत्येक दिवस महत्त्वाचा

धनुच्या धनेषात सूर्य, स्वराशीत शुक्र. प्रत्येक दिवस महत्त्वाचा ठरेल. तिळातिळाने कमी होणारे महत्त्व नव्याने प्रस्थापित करा. नोकरीधंद्यात सुधारणा होईल. प्रगती व लाभ होईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रातील गुंता सोडवा. कठीण कामे होतील. नवीन डावपेच ठरवता येतील. मैत्रीसाठी गैरसमज दूर करा. संसारात हसतेखेळते वातावरण राहील. शुभ दिनांक – 15, 17

प्रकृतीची काळजी घ्या

मकरेच्या स्वराशीतील सूर्य, व्ययेषात शुक्र. शब्द हे शस्त्र ठरतात तेव्हा प्रसंगावधान ठेवा. प्रकृतीची काळजी घ्या. प्रवासात अडचणी येतील. नोकरीतील गैरसमज दूर करणे सोपे नाही. आर्थिक व्यवहार सावरणे कठीण आहे. धंद्यात विचारपूर्वक पावले उचला. खर्च वाढेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात चौफेर गुप्त कारवाया होत असल्याचे जाणवेल. शुभ दिनांक – 15, 17

नम्रता व संयम बाळगा

कुंभेच्या व्ययेषात सूर्य, एकादशात शुक्र. नम्रता ठेवल्यास कामे होतील. तिळगूळ घ्या गोड बोला, हे धोरण महत्त्वाचे ठरेल. नोकरीत क्षुल्लक अडचणी येतील. धंद्यात नवे काम मिळेल, व्यवसायात लाभ व वाढ होईल. वसुली करा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात ओराप, टीका होईल. कायद्याला धरून वागा. प्रभाव वाढेल. प्रेमाने मत व्यक्त करणे फायद्याचे. शुभ दिनांक – 18, 19

मनाप्रमाणे यश मिळेल

मीनेच्या एकादशात सूर्य, दशमेषात शुक्र. बुधवारपासून तुमच्या प्रत्येक कार्याला गती मिळेल. गैरसमज दूर सारून नव्याने संबंध तयार करा. नोकरीधंद्यात मनाप्रमाणे यश मिळेल. कला, साहित्य, क्रीडा या क्षेत्रात बाजी माराल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात मान, प्रतिष्ठा मिळेल. लोकप्रियतेत वाढ होईल. पद मिळेल. घरगुती कामे होतील. खरेदी-विक्रीत लाभ होईल. शुभ दिनांक – 1 7, 18