साप्ताहिक राशिभविष्य – रविवार 17 सप्टेंबर ते शनिवार 23 सप्टेंबर 2023

>> नीलिमा प्रधान

मेष – नोकरीत व्याप वाढतील

मेषेच्या षष्ठेशात सूर्य, चंद्र, बुध त्रिकोणयोग. तुमच्या मर्जीनुसार घटना घडतील अशा भ्रमात राहू नका. विरोधकांच्या गुप्त कारवाया वाढतील. बुद्धिचातुर्य, नम्रता यावरच यश मिळवा. नोकरीत व्याप वाढतील. धंद्यात अस्थिरता वाढेल. कर्ज वाढवू नका. राजकीय, सामाजिक क्षेत्रात आरोपांचे सत्र वाढेल. शुभ दिनांक : 18, 19

वृषभ – गैरसमज मिटवा

वृषभेच्या पंचमेषात सूर्य, चंद्र शुक्र त्रिकोणयोग. मन अस्थिर होईल, परंतु महत्त्वाच्या कामावर लक्ष केंद्रित करा. जवळची माणसे मदत करतील. नोकरीत कामे वाढली तरी प्रभाव टिकवता येईल. सावधपणे व्यवहार करा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात योग्य संधी शोधा. गैरसमज, तणाव मिटवा. वरिष्ठांना खूष करता येईल. शुभ दिनांक: 17, 21

मिथुन – दुखापत टाळा

मिथुनेच्या चतुर्थात सूर्य, चंद्र बुध लाभयोग. दुखापत टाळा. कायदा पाळा. नोकरीत वरिष्ठांना मदत करावी लागेल. धंद्यात लाभ, गुंतवणूक करा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात अचानक वाद, तणाव निर्माण होईल. कठीण परिस्थितीवर मात करून पुढे जाता येईल. कौटुंबिक प्रश्न रेंगाळत ठेवू नका. कोणतीही जबाबदारी टाळू नका. शुभ दिनांक: 17, 18

कर्क – आत्मविश्वास वाढेल

कर्केच्या पराक्रमात सूर्य, चंद्र, बुध त्रिकोणयोग. आत्मविश्वास, उत्साह वाढवणाऱ्या घटना घडतील. विरोधकांना संधी देऊ नका. नोकरीत प्रगती होईल. धंद्यात सुधारणा, वसुली करा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात दिग्गज व्यक्तींचा सहवास लाभेल. प्रतिष्ठा वाढेल. जनतेच्या हिताचा निर्णय प्रभावी ठरेल. शुभ दिनांक : 17, 20

सिंह – व्यवहारात सावध रहा

सिंहेच्या धनेषात सूर्य, मंगळ, गुरू षडाष्टक योग. जवळच्या व्यक्तीसोबत मतभेद होतील. धंद्यात समतोल धोरण ठेवा. खर्च जपून करा. डोळ्यांची काळजी घ्या. नोकरीत कठीण कामे करून दाखवाल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात कोणताही व्यवहार सावधपणे करा. तणाव होईल. प्रतिष्ठा वाढेल. जिद्द ठेवा. शुभ दिनांक : 18, 19

कन्या – धंद्यात मोह नको

स्वराशीत सूर्य, चंद्र, शुक्र त्रिकोण योग. परिणामांचा विचार करूनच कोणतेही वक्तव्य करा. जुळून आलेला व्यवहार टिकवा. नोकरीत प्रगती होईल. धंद्यात मोह नको. वाद टाळा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात जुन्या मैत्रीला उजाळा मिळेल. नवे डाव रचण्याचा विचार होईल. बोलण्यावर संयम ठेवा. कुटुंबात नम्रता ठेवा. शुभ दिनांक : 18, 19

तूळ – क्षुल्लक वाद होतील

तुळेच्या व्ययेषात सूर्य, चंद्र, शुक्र त्रिकोणयोग. अपमानकारक वाद होईल. संयम, सहनशीलता बाळगा. महत्त्वाची कामे वेळेत पूर्ण करा. दुखापत टाळा. कायदा पाळा. नोकरीत कटकट, व्याप वाढेल. धंद्यात कष्ट होतील. राजकीय, सामाजिक क्षेत्रात पाणउतारा करणारे प्रसंग अचानक येतील. प्रेमाची माणसे मदत करतील. शुभ दिनांक : 20, 21

वृश्चिक – रागावर नियंत्रण ठेवा

वृश्चिकेच्या एकादशात सूर्य, राश्यांतर, चंद्र, गुरू त्रिकोणयोग. आठवडय़ाच्या सुरूवातीला रागावर नियंत्रण ठेवा. तुमचे वर्चस्व वाढेल. नोकरीधंद्यात वाढ होईल. थकबाकी वसूल करा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात तुमचे डावपेच यशस्वी होतील. आत्मविश्वास व प्रतिष्ठा वाढेल. कठीण कामे करा. शुभ दिनांक : 21, 22

धनु – मानसिक दडपण वाढेल

धनुच्या दशमेषात सूर्य, चंद्र, बुध लाभयोग. मानसिक दडपण वाढेल. तुम्हाला एकटे पाडण्याचा कट रचला जाईल. प्रकृतीची काळजी घ्या. नोकरीत प्रभाव वाढेल. धंद्यात चर्चा यशस्वी होतील. राजकीय, सामाजिक क्षेत्रात वर्चस्व राहील. दूरदृष्टिकोन बाळगा. गुप्त कारवायांवर नजर ठेवा. स्पर्धा जिंका. शुभ दिनांक : 17, 18

मकर – कलाक्षेत्रात यश मिळेल

मकरेच्या भाग्येषात सूर्य, चंद्र, शुक्र त्रिकोणयोग. सप्ताहाच्या शेवटी गैरसमज होतील. वक्तव्य करताना काळजीपूर्वक करा. नोकरीत वर्चस्व राहील. नवीन परिचय उत्साहवर्धक ठरतील. कलाक्षेत्रात यश मिळेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात तुम्ही जम बसवा. नियोजनबद्ध कार्य करा. कठीण कामे करा. शुभ दिनांक : 17, 19

कुंभ – संयम बाळगा

कुंभेच्या अष्टमेषात सूर्य, मंगळ, गुरू षडाष्टकयोग. मानसिक, शारीरिक तणाव, चिंता त्रस्त करतील. कोणतेही काम करताना सावध रहा. दुखापत टाळा. कुटुंबात, मैत्रीत गैरसमज होतील. नोकरीत व्याप वाढेल. धंद्यात सावध रहा. प्रतिष्ठा जपा. मौल्यवान वस्तू जपा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात संयम ठेवा. शुभ दिनांक : 18, 19

मीन – कठोर शब्द नको

मीनेच्या सप्तमेषात सूर्य, चंद्र, शुक्र त्रिकोणयोग. श्रीगणेशाच्या पूजनाची तयारी करताना मन स्थिर ठेवा. कठोर शब्द त्रासदायक ठरतील. नोकरीधंद्याला चालना मिळेल. चर्चेत सावधपणे बोला. राजकीय, सामाजिक क्षेत्रात वरिष्ठ तुम्हाला संधी देतील. नवीन परिचय उत्साहवर्धक मात्र सावधानता बाळगा. प्रतिष्ठा जपा. शुभ दिनांक : 20, 21