साप्ताहिक राशिभविष्य – रविवार 18 फेब्रुवारी ते शनिवार 24 फेब्रुवारी 2024

>> नीलिमा प्रधान

मेष : आत्मविश्वास वाढेल
मेषेच्या एकादशात बुध, शुक्र, मंगळ युती. प्रत्येक दिवस यशस्वी करण्याची जिद्द ठेवा. उत्साह, आत्मविश्वास वाढेल. नोकरीधंद्यात लाभ, वाढ होईल. थकबाकी मिळवा. राजकीय, सामाजिक कार्याला नवी दिशा देण्याचे मुद्दे तयार करता येतील. मान, प्रतिष्ठा लाभेल. नवीन परिचय महत्त्वाचे ठरतील. कौटुंबिक कामे होतील.
शुभ दिनांक : 20, 21

वृषभ : अडचणी कमी होतील
वृषभेच्या दशमेषात बुध, सूर्य, चंद्र त्रिकोणयोग. कठीण प्रसंगावर मात करता येईल. नोकरीतील कामे होतील. वरिष्ठ कौतुक करतील. धंद्यात सुधारणा होईल. कौटुंबिक तणाव कमी होईल.समस्या सोडवता येतील. राजकीय, सामाजिक कार्यातील अडचणी कमी होतील. आशादायक परिस्थिती राहील. सर्वांचे सहकार्य मिळेल.
शुभ दिनांक : 21, 22

मिथुन : योजना पूर्ण करा
मिथुनेच्या भाग्येषात बुध, सूर्य, चंद्र त्रिकोणयोग. गुप्त कारवायांवर लक्ष ठेवा. गोड बोलण्यावर जास्त विश्वास ठेवू नका. मैत्रीत, नात्यात, संसारात गैरसमज उद्भवतील. नोकरीत कामामध्ये लक्ष द्या. धंद्यात संयम ठेवा. फसगत, मोह टाळा. राजकीय, सामाजिक कार्यातील योजना पूर्ण करा. नवीन परिचय धोकादायक ठरू शकतात. व्यसन, मोह नको.
शुभ दिनांक : 21, 22

कर्क : प्रवासात सावध रहा
कर्केच्या अष्टमेषात बुध, सूर्य, चंद्र षडाष्टक योग. सप्ताहाच्या सुरुवातीला अडचणी येतील. कायदा पाळा. तणाव वाढवू नका. नोकरीच्या कामात सावध रहा. वरिष्ठांना दुखवू नका. धंद्यात संयम, सभ्यता ठेवा. लाभ होईल. राजकीय, सामाजिक कार्यात मुद्दय़ाला धरून वक्तव्य करा. वरिष्ठांची मर्जी पाहून चर्चा करा. प्रतिष्ठा जपा. प्रवासात सावध रहा. प्रकृतीची काळजी घ्या.
शुभ दिनांक : 23, 24

सिंह : नोकरीत वर्चस्व राहील
सिंहेच्या सप्तमेषात बुध, सूर्य, चंद्र त्रिकोणयोग. गैरसमज व वाद टाळा. गुप्त कारवायांवर नजर ठेवा. नोकरीत वर्चस्व राहील. धंद्यात नुकसान टाळा. फसगत होईल. राजकीय, सामाजिक कार्यात मनस्ताप होईल. प्रतिष्ठा जपता येईल. जनसंपर्कात अडचणी येतील. नम्रपणे बोला. घरगुती कामात अडचणी येतील.
शुभ दिनांक : 18, 19

कन्या : कराराची घाई नको
कन्येच्या षष्ठेशात बुध, शुक्र, मंगळ युती. प्रेमाने बुद्धिचातुर्याने प्रसंग निभावून न्या. कायदा पाळा. नोकरीत अडचण येईल. धंद्यात लाभ होईल. कराराची घाई नको. परिचयात वाढ होईल. राजकीय, सामाजिक कार्यात गुप्त कारवाया होतील. वरिष्ठांच्या मनात संभ्रम निर्माण करून दिला जाईल. अहंकार नको. कुटुंबातील वृद्धांची चिंता वाटेल.
शुभ दिनांक : 18, 20

तूळ : क्षुल्लक तणाव जाणवेल
तुळेच्या पंचमेषात बुध, सूर्य, चंद्र त्रिकोणयोग. मैत्रीत, नात्यात क्षुल्लक तणाव जाणवेल. संयम ठेवा. वाहन जपून चालवा. नोकरीत बुद्धिचातुर्य वापरा. धंद्यात गोड बोला. हिशेब नीट करा. घाई नको. राजकीय, सामाजिक क्षेत्रात तत्पर रहा. कठीण कामे त्वरित पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. वाद वाढवू नका. व्यवहारात हलगर्जीपणा नको. स्पर्धेत यश मिळेल.
शुभ दिनांक : 19, 20

वृश्चिक : अहंकार दूर ठेवा
वृश्चिकेच्या चतुर्थात बुध, शुक्र, मंगळ युती. मैत्रीच्या भाषेतून भाष्य केल्यास अधिक प्रभाव पडेल. अहंकार दूर ठेवा. नोकरीत सतर्क रहा. नवीन परिचयात वाढ होईल. राजकीय, सामाजिक कार्यात चौफेर नजर ठेवा. दिग्गज लोकांशी नम्रतापूर्वक वागा. स्पर्धा सोपी नाही. व्यवहारात फायदा होईल. कायदा मोडेल असे कृत्य अथवा भाष्य टाळा.
शुभ दिनांक : 22, 23

धनु : वर्चस्व सिद्ध कराल
धनुच्या पराक्रमात बुध, चंद्र, गुरू लाभयोग. सप्ताह कसोटीचा, वर्चस्व सिद्ध करण्याचा ठरेल. प्रकृतीची काळजी घ्या. नोकरीत व्याप वाढेल. धंद्यात वाढ, दगदग होईल. वसुली करण्याचा प्रयत्न करा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात संमिश्र स्वरूपाचे अनुभव येतील. योग्य दिशा ठरवावी असे वाटेल. प्रतिष्ठा, लोकप्रियता वाढवण्यात अडचण येईल. जिद्द ठेवा.
शुभ दिनांक : 19, 20

मकर : व्यवहारात लाभ होईल
मकरेच्या धनेषात बुध, शुक्र, मंगळ युती. दिशादर्शक कालावधी ठरेल. नोकरीत प्रतिष्ठा वाढेल. चांगला बदल शक्य होईल. नवीन परिचय उत्साहवर्धक, आत्मविश्वास देणारा ठरेल. धंद्यात वाढ होईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात अचानक कलाटणी मिळेल. कामे वेगाने पूर्ण करा. भावना व कर्तव्य यांचा योग्य मेळ घाला. व्यवहारात फायदा होईल. कर्जाचे काम करून घ्या.
शुभ दिनांक : 18, 22

कुंभ : प्रकृतीची काळजी घ्या
स्वराशीत बुध, चंद्र, गुरू लाभयोग. भावनांचा उद्रेक होईल. मात्र संयम बाळगा. प्रकृतीची काळजी घ्या. आपापसांत गैरसमज होतील. व्यसन, मोहापासून दूर रहा. नोकरीत प्रभाव राहील. धंद्यात समतोल राखा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात कणखर व्यक्तित्वाचे दर्शन होईल. नवीन ओळख तपासून पहा. प्रतिष्ठा वाढवणारे प्रसंग तुमच्या क्षेत्रात येतील.
शुभ दिनांक : 19, 20

मीन : कायदा मोडू नका
मीनेच्या व्ययेषात बुध, शुक्र, मंगळ युती. अधिकार गाजवण्यापेक्षा प्रेमाने कोणतेही प्रश्न सोडवावा लागेल. नोकरीत बेसावध राहू नका. धंद्यात कायदा पाळा. वाढ होईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात प्रतिष्ठा जपा. कायदा मोडून काम करू नका. वरिष्ठांना दुखवू नका. संयम ठेवा. गुप्त कारवायांवर नजर ठेवा. प्रश्न वाढवू नका. कुटुंबाची चिंता जाणवेल.
शुभ दिनांक : 18, 19