साप्ताहिक राशीभविष्य- रविवार 19 नोव्हेंबर ते शनिवार 25 नोव्हेंबर 2023

 

>>नीलिमा प्रधान

मेष- निर्णयाची घाई नको
सूर्य, चंद्र षडाष्टक योग, चंद्र, गुरू युती. उतावळेपणा, अतिरेक, संताप करून प्रश्न सोडवता येत नाहीत. जवळच्या व्यक्ती उपयोगी पडणार नाहीत. सद्सद्विवेकबुद्धी आणि चांगल्या सल्ला उपयोगी पडेल. कोणत्याही निर्णयाची घाई नको. राजकीय, सामाजिक क्षेत्रात प्रतिष्ठा जपा.
शुभ दिनांक : 20, 21

 

वृषभ- उत्साहवर्धक वातावरण
चंद्र, बुध लाभयोग, सूर्य, चंद्र त्रिकोणयोग. कोणताही कठीण प्रश्न रेंगाळत ठेवू नका. गैरसमज मिटवता येतील. नोकरीत उत्साहवर्धक वातावरण राहील. धंद्यात वाढ होईल. नवीन परिचय फायदेशीर ठरतील. राजकीय, सामाजिक क्षेत्रातील समस्या सोडवण्याची संधी मिळेल. कौटुंबिक सौख्य वाढेल.
शुभ दिनांक : 21, 22

मिथुन- अहंकार दूर ठेवा
सूर्य, षडाष्टक योग, चंद्र, शुक्र प्रतियुती. प्रेमाने, सरळ संभाषणाने प्रश्न सोडवा. अहंकाराने नुकसान होईल. कायदा पाळा. नोकरीधंद्यात तत्परता ठेवा. वाद वाढवू नका. वसुली करा पण संयमाने. राजकीय, सामाजिक क्षेत्रात विरोधक संतापजनक वक्तव्य करतील. वरिष्ठांना दुखवू नका. स्पर्धा कठीण पण जिद्द ठेवा.
शुभ दिनांक : 21, 22

 

कर्क- प्रेरणादायक घटना
सूर्य, प्लुटो लाभयोग, चंद्र, शुक्र प्रतियुती. किरकोळ अडचणींवर मात करून यश मिळवता येईल. प्रेरणादायक घटना घडतील. नोकरीत वर्चस्व राहील. धंद्यात सुधारणा होईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात प्रभावी मुद्दे मांडता येतील. लोकप्रियता वाढेल. कौटुंबिक वाटाघाटीत यश मिळेल. प्रवासाचा आनंद घ्याल.
शुभ दिनांक : 23, 25

सिंह- दगदग करू नका
चंद्र, गुरू लाभयोग, चंद्र, शुक्र प्रतियुती. सप्ताहाच्या मध्यावर धावपळ, दगदग करू नका. दुखापत होईल. कायदा मोडू नका. नोकरीच्या कामात सतर्क रहा. धंद्यात हिशेब चुकवू नका. राजकीय, सामाजिक क्षेत्रात गुप्त कारवाया वाढतील. जनतेचे प्रेम लाभेल. अहंकार नको. वरिष्ठांना कमी लेखू नका.
शुभ दिनांक : 21, 25

 

कन्या- प्रसंगावधान बाळगा
सूर्य, चंद्र त्रिकोणयोग, चंद्र, शुक्र प्रतियुती. नकळत झालेली चूक त्रासयदाक ठरेल. थट्टामस्करी प्रसंगावधान ठेवा. कोणताही अतिरेक गैरसमज निर्माण करेल. नोकरीत व्याप असला तरी प्रभाव राहील. रागावर ताबा ठेवा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात महत्त्वाचे काम देण्यात येईल. खरेदी विक्रीत लाभ.
शुभ दिनांक : 19, 23

तूळ- संघर्षानंतर यश लाभेल
चंद्र, गुरू लाभयोग, सूर्य, चंद्र त्रिकोणयोग. भावनेच्या आहारी न जाता निर्णय घ्या. चुका टाळता येतील. मौल्यवान वस्तू जपा. मैत्रीत, नात्यात गैरसमज होतील. राजकीय, सामाजिक क्षेत्रात मुद्दे मांडताना कोणालाही दुखवू नका. धंद्यात वाढ होईल. नोकरीत संघर्षानंतर यश मिळेल. प्रकृतीची काळजी घ्या.
शुभ दिनांक : 21, 25

वृश्चिक- प्रवासात घाई नको
चंद्र, शुक्र प्रतियुती, बुध, हर्षल षडाष्टक योग. तुमचा मुद्दा योग्य असला तरी सौम्य शब्दात बोला. प्रवासात घाई नको. अहंकारयुक्त भाषा योग्य ठरणार नाही. नोकरीत व्याप राहील. धंद्यात वाढ होईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात दगदग होईल. प्रतिमा उजळेल असे कार्य करा. कौटुंबिक कामात आळस नको.
शुभ दिनांक : 19, 23

 

धनु- मनोबल टिकवा
चंद्र, गुरू लाभयोग, चंद्र, शुक्र प्रतियुती. अडथळे, अडचणी यातून मार्ग काढावा लागेल. अपमानास्पद शब्द ऐकावे लोगतील. मनोबल टिकवा परंतु अहंकाराची भाषा नको. नोकरीच्या कामात चूक टाळा. धंद्यात दिलेला शब्द पाळणे सोपे नाही. राजकीय, सामाजिक क्षेत्रात पाहिजे तेच घडेल असे नाही. प्रतिष्ठा जपा.
शुभ दिनांक : 21, 25

 

मकर- उत्साहवर्धक काळ
चंद्र, बुध लाभयोग, सूर्य, चंद्र त्रिकोणयोग. प्रत्येक दिवस उत्साहवर्धक, आत्मविश्वास वाढविणारा ठरेल. नियोजनबद्ध कार्य करा. कामे मार्गी लावता येतील. नोकरीत प्रगती होईल. धंद्यातील प्रश्न रेंगाळत ठेवू नका. राजकीय, सामाजिक क्षेत्रात प्रगतीचा नवा मार्ग शोधता येईल. गुप्त कारवायांना कमी लेखू नका.
शुभ दिनांक: 21, 22

कुंभ- सावधपणे बोला
चंद्र, बुध लाभयोग, सूर्य, चंद्र त्रिकोणयोग. सप्ताहाच्या सुरूवातीला सावधपणे बोला. तणाव, गैरसमज टाळा. तुम्हाला फसवण्याचा प्रयत्न केला जाईल. नोकरीत वर्चस्व राहील. धंद्यात फसगत टाळा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात विरोधक गुप्त कारवाया करतील. कणखर रहा. कौटुंबिक कामे होतील. प्रकृती जपा.
शुभ दिनांक : 24, 25

मीन- महत्त्वाची कामे करा
सूर्य, प्लुटो लाभयोग, चंद्र, शुक्र प्रतियुती. महत्त्वाची कामे सुरूवातीपासून करा. संयम ठेवा. तुमच्या स्वभावाचा गैरफायदा घेतला जाईल. साडेसातीचे वर्ष सुरू आहे. भावनेला महत्त्व देताना व्यवहारही पहा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात दर्जेदार कामे हातील. परिचय उत्साहवर्धक ठरतील.
शुभ दिनांक : 24, 25