साप्ताहिक राशिभविष्य – रविवार 21 जानेवारी ते शनिवार 27 जानेवारी 2024

>> नीलिमा प्रधान

मेष – नोकरीत बदल होईल

चंद्र, शुक्र प्रतियुती, चंद्र, शनि त्रिकोणयोग. तुमच्या कार्याला नवी दिशा मिळेल. योग्य मार्गाने प्रयत्न करा. नोकरीत मनाप्रमाणे बदल होईल. प्रगती व लाभ होईल. धंद्यात मोठे कंत्राट मिळेल. कर्जाचे काम करा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात अशक्य कामे होतील. सन्मान, लोकप्रियता, नवे डावपेच, रचना, चर्चा पार पडेल. स्पर्धेत यश मिळेल. शुभ दिनांक : 22, 24

वृषभ – प्रवासात सावध रहा

चंद्र, मंगळ प्रतियुती, चंद्र, शनि त्रिकोणयोग. क्षेत्र कोणतेही असो कमी बोला, चांगले बोला. प्रतिष्ठा वाढवणारे प्रसंग घडतील. प्रवासात सावध रहा. आरोग्याची काळजी घ्या. नोकरीतील समस्या सोडवा. नात्यात, मैत्रीत गैरसमज टाळा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात गोड बोलून कारवाया केल्या जातील. संताप वाढवणाऱया घटनांकडे दुर्लक्ष करा. शत्रुत्व वाढवू नका. शुभ दिनांक : 26, 27

मिथुन – बुद्धिचातुर्याचा वापर करा

सूर्य, चंद्र षडाष्टक, चंद्र, मंगळ प्रतियुती. बुद्धिचातुर्याने मत व्यक्त करा. अपमानकारक परिस्थितीला सामोरे जावे लागेल. ओळखीच्या व्यक्ती मदत करतील. संयम ठेवा. नोकरीत कठीण कामे येतील. धंद्यात अरेरावी नको. लाभ होईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात तुमचा अंदाज चुकेल. वरिष्ठ दबाव निर्माण करतील. लोकप्रियता उपयुक्त ठरेल. घरगुती कामे होतील. शुभ दिनांक : 25, 26

कर्क – कठोर बोलणे टाळा

चंद्र, बुध प्रतियुती, चंद्र, गुरू लाभयोग. कठोर बोलणे हानिकारक, वाद निर्माण करणारे ठरेल. गुप्त कारवाया वाढतील. नोकरीत स्पर्धा वाढेल. धंद्यात तडजोड स्वीकारावी लागेल. मोह, व्यसन नको. राजकीय, सामाजिक क्षेत्रात प्रतिष्ठा टिकवणे कठीण वाटेल. मुद्दे सौम्य शब्दांत व्यक्त करावे. दौऱयात सावध राहा. अतिरेक नको. शुभ दिनांक : 26, 27

सिंह – अहंकार दूर ठेवा

सूर्य, चंद्र षडाष्टक, चंद्र, बुध प्रतियुती. बुद्धिचातुर्याने मत व्यक्त करा. अहंकाराने नुकसान होईल. नोकरीत वरिष्ठांना मदत करावी लागेल. धंद्यात लाभ होईल. रागावर ताबा ठेवा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात वरिष्ठांचा दबाव सहन करावा लागेल. प्रकृतीची काळजी घ्या. दगदग वाढेल. लोकप्रियता उत्साहवर्धक ठरेल. घरातील व्यक्ती सहाय्य करतील. शुभ दिनांक : 22, 23

कन्या – वरिष्ठांची मर्जी राखा

चंद्र, प्लुटो प्रतियुती, चंद्र, नेपच्युन त्रिकोणयोग. प्रसंगावधान ठेवून बोला. कृती करा. नोकरीत वरिष्ठांची मर्जी राखता येईल. प्रभाव वाढेल. शत्रुत्व, कुत्सित बोलणे टाळा. धंद्यात सौम्य धोरण ठेवा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात वरिष्ठांच्या मनात किल्मिष टाकण्याचे काम जवळच्या व्यक्ती करतील. राग वाढू देऊ नका. प्रतिष्ठा कायम राहील. शुभ दिनांक : 21, 22

तूळ – शांतचित्ताने निर्णय घ्या

चंद्र, शुक्र प्रतियुती, चंद्र, गुरू लाभयोग. सप्ताहाच्या सुरुवातीला तणाव जाणवेल. कोणतेही काम करताना शांतचित्ताने विचार करून निर्णय घ्या. धंद्यात आत्मविश्वास, उत्साह वाढेल. अहंकार दूर ठेवा. नोकरीत कामाच्या अडचणी जाणवतील. राजकीय, सामाजिक क्षेत्रात वरिष्ठ कठीण कामे देतील. परीक्षेचा कालावधी ठरेल. जिद्द ठेवा. शुभ दिनांक : 26, 27

वृश्चिक – चर्चेत यश मिळेल

चंद्र, बुध प्रतियुती, चंद्र, मंगळ प्रतियुती. परस्परविरोधी घटनांचा, प्रसंगांचा सामना करावा लागेल. समतोल राखा. कठोर बोलणे नको. नम्रता हेच वैशिष्टय़ ठरेल. नोकरीत बुद्धीची चमक दिसेल. धंद्यात चर्चेत यश मिळेल. नवे काम होईल. लाभ प्राप्त होईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात पेचप्रसंग सोडवाल. लोकप्रियता लाभेल. वाद वाढवू नका. गुप्त कारवायांना कमी लेखू नका. शुभ दिनांक : 21, 26

धनु – कामाचे कौतुक होईल

चंद्र, शुक्र प्रतियुती, चंद्र, गुरू लाभयोग. तुमच्या कामात अडचणी निर्माण करण्याचा प्रयत्न होईल. संयम ठेवा. कोणतेही वक्तव्य जपून करा. नोकरीत कामाचे कौतुक होईल. त्याप्रमाणे स्पर्धा वाढेल. धंद्यात लाभ होईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात उत्साह, आत्मविश्वास वाढेल. जनहिताच्या कामात अडथळय़ातून यश मिळेल. प्रतिष्ठा वाढेल. प्रवासात सावध रहा. शुभ दिनांक : 23, 24

मकर – प्रकृतीची काळजी घ्या

सूर्य, चंद्र प्रतियुती, चंद्र, शनि त्रिकोणयोग. यश सोपे समजू नका. तुमच्यावर सगळय़ा बाजूंनी टीकात्मक चर्चा होईल. जिद्द ठेवा. अहंकार नको. आरोग्याची काळजी घ्या. प्रवासात धोका पत्करू नका. नोकरी टिकवा. व्यवसायात फसगत टाळा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात तटस्थ राहून प्रसंगांचे निरीक्षण करा. मत व्यक्त करण्याचा उतावळेपणा करू नका. शुभ दिनांक : 26, 27

कुंभ – क्षुल्लक अडचणी येतील

चंद्र, शुक्र प्रतियुती, चंद्र, गुरू लाभयोग. कोणतेही काम करण्यात क्षुल्लक अडचणी येतील. कुठेही प्रतिष्ठेचा प्रश्न निर्माण करू नका. नोकरीत व्याप, दगदग होईल. धंद्यात लाभ होईल. व्यवसायात गोड बोला. राजकीय, सामाजिक क्षेत्रात वरिष्ठांचा शब्द पाळावा लागेल. दबाव नकोसा वाटेल. प्रतिष्ठा जपा. प्रसंगावधान ठेवा. स्पर्धा कठीण आहे. शुभ दिनांक : 23, 24

मीन – प्रत्येक दिवस प्रेरणादायी

चंद्र, गुरू लाभयोग, बुध, मंगळ युती. प्रत्येक दिवस उत्साहवर्धक व प्रेरणादायी ठरेल. कठीण कामे करून घ्या. खरेदी-विक्रीत लाभ होईल. नोकरीत कामाची प्रशंसा होईल. कामात प्रगती होईल. बदल शक्य. राजकीय, सामाजिक क्षेत्रात लोकसंग्रह वाढेल. प्रतिष्ठा, पद मिळेल. गैरसमज दूर करून संबंध मैत्रीपूर्ण होतील. घरातील प्रश्न सोडवा. शुभ दिनांक : 21, 26