साप्ताहिक राशिभविष्य- 21 मार्च ते 27 मार्च 2020

>> मानसी इनामदार (ज्योतिषतज्ञ)

मेष- चांगले घडेल
विनाकारण स्वतःबद्दल चुकीचे शब्द उच्चारूहीं नका. अनपेक्षित चांगले घडणार आहे. पोवळे धारण केल्यामुळे मन खंबीर राहील.
शुभ अलंकार – मंगळसूत्र, कडे

वृषभ- अद्भूत आठवडा
खूप काही चांगले घडण्याचा अद्भुत आठवडा. गुंतवणूक फायदेशीर ठरेल. जवळच्या माणसाकडून उपद्रव होण्याची शक्यता. हिरा धारण केल्याचा कलावंतांना फायदा होईल. शुभ अलंकार – डिझायनर दागिने

मिथून- आवडीची व्यक्ती
तुमचे प्रेम एक वेगळी उंची गाठेल. आवडीचा जोडीदार मिळेल. आर्थिक गुंतवणूक योग्य जागी करा. हा चांगला काळ आहे. पाचू श्वसनविकारांवर उपयुक्त ठरेल. शुभ अलंकार – बुगडी, ब्रेसलेट

कर्क- आराम कराल
महत्त्वाच्या योजना मार्गी लागतील. त्यामुळे मनास समाधान मिळेल. या आठवडय़ात सुट्टी घेऊन आराम कराल. मोती घातल्याने संवेदनशीलता वाढेल.
शुभ अलंकार – मोत्याच्या कुडय़ा, कमरपट्टा

सिंह- पाहुण्यांचे स्वागत
तुमच्या बऱयाचशा इच्छा आकांक्षा पूर्ण होणार आहेत. अनपेक्षित जबाबदारी यशस्वीपणे पार पाडाल. पाहुण्यांचे स्वागत कराल. छोटासा सोहोळा साजरा होईल. संततीच्या आरोग्यासाठी माणिक उपयुक्त ठरेल.
शुभ अलंकार – तोडे, नथ

कन्या- मुलांची प्रगती
तुम्ही अत्यंत चाणाक्ष आहात. आर्थिक व्यवहार यशस्वी होतील. आवडीचे पदार्थ खाण्यास मिळतील. मुलांची छोटीशी प्रगतीही मनास सुखावणारी असेल. पाचूमुळे बुद्धीची कामे निपटून टाकाल. शुभ अलंकार – फुलांची क्लिप, मोत्याचे वेल

तूळ- पैसे महत्त्वाचे
आर्थिक व्यवहार आणि वायदे यांच्यात योग्य ताळमेळ राखा. मुलांचा पाठिंबा लाभेल. त्यामुळे मनास समाधान मिळेल. हिऱ्यामुळे सौंदर्य वाढेल.
शुभ अलंकार – हिऱ्याची अंगठी, सोन्याच्या बांगडय़ा

वृश्चिक- घरात सुधारणा
प्रदीर्घ आजारापासून सुटका. सरकारी कामातून लाभ होतील. घरात सुधारणा करून घ्याल. चंदनाची माळ जवळ ठेवा. पोवळ्यामुळे वाईट नजरेपासून बचाव होईल. शुभ अलंकार – सोन्याची साखळी, पैंजण

धनु- भावंडांची साथ
गुंतवणूक समृद्धी आणि आर्थिक सुरक्षिततेस पूरक ठरेल. शीघ्रकोपी स्वभावाला आवर घाला. भावंडांची साथ मोलाची ठरेल. पुष्कराज धारण केल्याने वैवाहिक जीवनात फायदा होईल. शुभ अलंकार – शिंपल्याचा दागिना, चांदी

मकर- तेजस्विता वाढेल
दूरचे प्रवास घडतील. त्यातून आर्थिक लाभ होतील. अति जवळीक साधणाऱया अनोळखी व्यक्तींपासून दूर रहा. नीलम धारण केल्याने तेजस्विता वाढेल. शुभ अलंकार – चांदीचे पेंडंट, नवरत्नांची अंगठी

कुंभ- मनाजोगे घडेल
आईने केलेली मदत खूप महत्त्वाची ठरेल. त्यामुळे आर्थिक अडचणींवर मात करणे शक्य होईल. नीलम धारण केल्याने मनोवांच्छित फळ मिळेल. शुभ अलंकार – तांब्याचे वळे, चांदी

मीन- लेखनाचे कौतुक
नसते आजारपण मागे लागेल, पण तुमच्या मनाच्या शक्तीने त्यावर मात द्याल. लेखकांना यशदायी आठवडा. पुष्कराजमुळे व्यापार-उद्योगात फायदा होईल.
शुभ अलंकार – घडय़ाळ, कर्णभूषणे

[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या