>> नीलिमा प्रधान
मेष – कामाचे कौतुक होईल
मेषेच्या दशमेषात बुध, शुक्र, शनि लाभयोग. सप्तमीच्या सुरुवातीला मनाविरुद्ध घटना घडतील. नोकरीधंद्यात प्रभाव टिकवाल. वरिष्ठ कामाचे कौतुक करतील. वसुली कराल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात दूरदृष्टिकोनातून डावपेच ठरवता येतील. पfिरचय आत्मविश्वास वाढवणारे ठरतील. लोकप्रियता मिळेल. कौटुंबिक कामे होतील. आनंदी राहाल.
शुभ दिनांक : 28, 2
वृषभ – गैरसमज, वाद उद्भवतील
वृषभेच्या भाग्येषात बुध, सूर्य, चंद्र त्रिकोणयोग. भावनेच्या भरात निर्णय घेऊ नका. नात्यात, मैत्रीत, धंद्यात गैरसमज वाद उद्भवतील. व्यसन नको. कोणत्याही प्रकारची फसगत होऊ शकते. नोकरीत प्रभाव राहील. राजकीय, सामाजिक क्षेत्रात अधिकारात वाढ होईल. गुप्त कारवायांवर करडी नजर ठेवा. वाहन जपून चालवा.
शुभ दिनांक : 30, 31
मिथुन – कायदा पाळून कामे करा
सूर्य, चंद्र षडाष्टक योग, मिथुनेच्या अष्टमात बुध. कायदा पाळून कामे करा. चुकीची प्रतिक्रिया देऊ नका. नोकरी टिकवा. टीका करताना सावध रहा. धंद्यात लाभ होईल. कराराची घाई नको. राजकीय, सामाजिक क्षेत्रात लोकप्रियता राहील. नम्रता ठेवा. कठोर शब्द शस्त्रं बनतात. तेव्हा जपून बोला. घरातील कामे होतील.
शुभ दिनांक : 28, 2
कर्क – प्रत्येक दिवस यश देणारा
कर्केच्या सप्तमेषात बुध, चंद्र, गुरू प्रतियुती. प्रत्येक दिवस यश देणारा आहे. भावना व कर्तव्य यांची योग्य सांगड घाला म्हणजे गैरसमज टाळता येतील. नोकरीत प्रगती होईल. धंद्यात सावधपणे बोला. फसगत टाळा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात समोरील व्यक्तीकडून मन:स्ताप होण्याची शक्यता. सार्वजनिक क्षेत्रात कोणतेही वक्तव्य जपून करा.
शुभ दिनांक : 30, 31
सिंह – नोकरीत व्याप होतील
सूर्य, चंद्र षडाष्टक योग, षष्ठात बुध प्रवेश. कठीण प्रसंगांवर मात करता येईल. कायदा पाळूनच कोणतीही कृती व वक्तव्य करा. नोकरीत व्याप होतील. मित्र मदत करतील. धंद्यात कष्टातून लाभ होईल. वसुली करा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात प्रतिष्ठेवर आघात होईल. आरोप होतील. वरिष्ठांवर टीका करणे घातक ठरेल. स्पर्धा सोपी नाही.
शुभ दिनांक : 30, 31
कन्या – कोणताही वाद वाढवू नका
कन्येच्या पंचमेषात बुध, सूर्य, चंद्र त्रिकोणयोग. रेंगाळलेली कामे करा. काम यशस्वी होण्यासाठी नियोजनाची आवश्यकता असते हे लक्षात असू द्या. कोणताही वाद वाढवू नका. नोकरीधंद्यात प्रगती होईल. महत्त्वाच्या व्यक्तीची भेट होईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात नवीन परिचयात जास्त जवळीक करू नका. वरिष्ठांना मुद्दे पटतील. प्रवासात घाई नको.
शुभ दिनांक : 1, 2
तूळ – व्यवहारात सावध रहा
तुळेच्या सुखेषात बुध, शुक्र, शनि लाभयोग. सप्ताहाच्या मध्यावर कामात चूक होईल. कायदा पाळा. नोकरीत व्याप होईल. धंद्यात प्रगती होईल. तरीही व्यवहारात, हिशेबात सावध रहा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात प्रतिष्ठा टिकवा. तुमच्यावर टीका होईल. जवळच्या व्यक्ती सहाय्य करतील. कला, क्रीडा क्षेत्रात प्रगतीची संधी लाभेल.
शुभ दिनांक : 28, 29
वृश्चिक – नवीन संधी मिळेल
वृश्चिकेच्या पराक्रमात बुध, सूर्य, चंद्र त्रिकोणयोग. सप्ताहाच्या शेवटी अडचणी येतील. वाद टाळा. नवीन परिचय उपयुक्त ठरतील. नोकरीत बुद्धीची चमक दिसेल. नवीन संधी मिळेल. धंद्यात नवी दिशा मिळेल. वसुली करा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात किचकट कामे होतील. मानसन्मान वाढेल. नवे पद बहाल होईल. कला, क्रीडा, साहित्यात प्रेरणादायक वातावरण राहील.
शुभ दिनांक : 30, 31
धनु – अधिकार लाभतील
धनुच्या धनेषात बुध, शुक्र, गुरू त्रिकोणयोग. प्रत्येक दिवस शह देणारा. महत्त्वाची कठीण कामे करा. नोकरीत वरिष्ठ कौतुक करतील. चांगला बदल शक्य आहे. धंद्यात नवा करार, लाभ होईल. थकबाकी मिळवा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात सन्मान वाढेल. लोकप्रियता उपयुक्त ठरेल. नवे पद, अधिकार लाभतील. कायद्याची कामे करून घ्या. घरातील व्यवहार होईल.
शुभ दिनांक : 31, 2
मकर – नोकरीत वर्चस्व राहील
स्वराशीत बुध, मंगळ, हर्षल त्रिकोणयोग. मंगळवारपासून दिलासा देणारा कालावधी असेल. खाण्यापिण्याची काळजी घ्या. व्यसन, मोह टाळा. जवळच्या व्यक्तीकडून मन:स्ताप होईल. नोकरीत वर्चस्व राहील. मैत्रीत गैरसमज होतील. धंद्यात हिशेब तपासा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात प्रतिष्ठा टिकवता येईल. भावनेच्या आहारी जाऊन कोणतेही धाडसी कृत्य करू नका.
शुभ दिनांक : 30, 31
कुंभ – स्वत:चे अधिकार जपा
कुंभेच्या व्ययेषात बुध प्रवेश. शुक्र, गुरू त्रिकोणयोग. अहंकारयुक्त भाषा तणाव, चिंता निर्माण करेल. गोड बोलून कामे करून घ्या. नोकरीत कठीण काम करावे लागेल. धंद्यात लाभ होईल. कायदा मोडू नका. राजकीय, सामाजिक क्षेत्रात स्वतचे अधिकार जपा. कोणतेही असभ्य विधान टाळा. मानहानी होऊ देऊ नका. स्पर्धा कठीण आहे.
शुभ दिनांक : 28, 29
मीन – विरोधकांना शह द्या
मीनेच्या एकादशात बुध, सूर्य, चंद्र त्रिकोणयोग. सप्ताहाच्या मध्यावर कठीण कामे करा. बुद्धिचातुर्याने यश मिळवा. नोकरीधंद्यात दगदग होईल. नवे काम मिळेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात विरोधकांना शह देऊन यश मिळवावे लागेल. वरिष्ठ कामाचे कौतुक करतील. नवे परिचय उत्साहवर्धक ठरतील. दौऱयात कायदा पाळा. वाद टाळा.
शुभ दिनांक : 30, 31