साप्ताहिक राशिभविष्य – रविवार 3 मार्च ते शनिवार 9 मार्च 2024

>> नीलिमा प्रधान

मेष – कामाची प्रशंसा होईल

मेषेच्या व्ययात बुध, एकादशात शुक्र. कोणत्याही क्षेत्रात विधान करताना घाई नको. शब्द शस्त्र ठरतात. नोकरीत कामाची प्रशंसा होईल. धंद्यात नवे काम मिळेल. लाभ होईल. तुमच्या क्षेत्रात पुढे जाण्याची संधी मिळेल. राजकीय, सामाजिक कार्यात नावलौकिक, जनतेचे प्रेम मिळेल. योजना गतिमान होतील.

शुभ दिनांक : 5, 7

वृषभ – नोकरीत प्रगती होईल

वृषभेच्या एकादशात बुध, दशमेषात शुक्र असल्यामुळे क्षुल्लक अडचणींवर मात करून चांगले यश मिळवता येईल. दिग्गज व्यक्तींचा परिचय होईल. सल्ला उपयुक्त ठरेल. नोकरीत प्रगती होईल. धंद्यात लाभ होईल. करारात लक्ष द्या. राजकीय, सामाजिक कार्यात वाढ होईल. लोकप्रियता लाभेल. नवी दिशा देता येईल. तत्परता दाखवाल. कौटुंबिक अडचणी कमी होती.

शुभ दिनांक : 3, 7

मिथुन – संयमाने कृती करा

मिथुनेच्या दशमेषात बुध, भाग्येषात शुक्र. राग वाढवणाऱया घटना घडतील. संयमाने कृती करा. प्रवासात सावध रहा. धंद्यात फायदेशीर चर्चा होईल. वसुली करा. नोकरीत प्रगतीची संधी लाभेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात कामाचे कौतुक होईल. अधिकार प्राप्ती होईल. योजनांना यश मिळेल. प्रतिष्ठा लाभेल. अधिकारप्राप्ती होईल. कामे रेंगाळत ठेवू नका.

शुभ दिनांक : 5, 6

कर्क – कामाचा ताण जाणवेल

कर्केच्या भाग्येषात बुध, अष्टमेषात शुक्र. कर्तव्य व भावना यांचा गुंता होईल. निर्णयात चूक होईल. सावध रहा. नोकरीत कामाचा ताण राहील. गैरसमज उद्भवतील. धंद्यात फसगत टाळा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात कायद्याला धरून वक्तव्य करा. मोह, व्यसन दूर ठेवा. प्रतिष्ठा जपा. तटस्थ धोरण उपयुक्त ठरेल.

शुभ दिनांक : 3, 7

सिंह – प्रकृतीची काळजी घ्या

सिंहेच्या अष्टमेषात बुध, सप्तमेषात शुक्र. झगडून यश खेचता येईल. कुणालाही कमी लेखू नका. प्रकृतीची काळजी घ्या. नोकरीत कामाचा ताण जाणवेल. मित्र मदत करतील. धंद्यात  हुशारीने चर्चा करा. गुंतवणूक होईल. वसुली करा. राजकीय, सामाजिक कार्याला प्रोत्साहन देणाऱया घटना घडतील. टीकात्मक चर्चा जपून करा.

शुभ दिनांक : 5, 6

कन्या – कायदा पाळा

कन्येच्या सप्तमेषात बुध, षष्ठात शुक्र. इतरांच्या चुका दाखवताना तारतम्य ठेवा. बाजू स्वतवर उलटू शकते. आरोग्याची योग्य ती काळजी घ्या. अतिविचार त्रासदायक ठरतील. मनस्ताप होईल. नोकरी टिकवा. चूक टाळा. धंद्यात गैरव्यवहार नको. राजकीय, सामाजिक कार्यात अडचणी येतील. कायदा मोडेल असे कृत्य नको.

शुभ दिनांक : 3, 7

तूळ – व्यवहारात काळजी घ्या

तुळेच्या षष्ठेशात बुध, पंचमेषात शुक्र. व्यवहारात चर्चा करताना काळजी घ्या. कुणालाही कमी लेखू नका. नोकरीत नवी संधी लाभेल. धंद्यात, व्यवहारात चूक नको. कायदा पाळा. राजकीय, सामाजिक कार्यात जुने संबंधित स्नेही नव्याने जोडले जातील. कामे वेळेत पूर्ण करा. प्रतिष्ठा वाढेल. शब्द जपून वापरा.

शुभ दिनांक : 3, 4

वृश्चिक – प्रतिष्ठा जपा

वृश्चिकेच्या पंचमेषात बुध, चतुर्थात शुक्र. आळस नको. प्रतिष्ठा जपा. नोकरीत काम वाढेल. चूक टाळा. धंद्यात नवा विचार उपयुक्त ठरेल. नवीन परिचयावर जास्त विश्वास नको. राजकीय, सामाजिक क्षेत्रात तुमच्या वक्तव्यावर टिकात्मक चर्चा होईल. प्रकृतीची काळजी घ्या.

शुभ दिनांक : 5, 7

धनु – महत्त्वाचा निर्णय घ्याल

धनुच्या चतुर्थात बुध, पराक्रमात शुक्र. मंगळवारपासून तुमच्या कार्याला नवी गती मिळेल. नोकरीत चांगला बदल घडेल. धंद्यात गुंतवणूक करा. नवे कंत्राट मिळेल. थकबाकी मिळवा. कर्जाचे काम करा. राजकीय, सामाजिक क्षेत्रातील कार्याला नेटाने पुढे नेता येईल. नवे संबंध प्रस्थापित करता येतील. पद, प्रतिष्ठा मिळेल. लोकसंग्रह वाढेल.

शुभ दिनांक : 7, 9

मकर – नवी संधी मिळेल

मकरेच्या पराक्रमात बुध, धनेषात शुक्र. अनेक चांगल्या योजना पुढे नेता येतील. उत्साह, आत्मविश्वास वाढेल. तुमच्या क्षेत्रात नवी संधी मिळेल. नोकरीत प्रगती होईल. प्रशंसा होईल. धंद्यात लाभ होईल. वसुली करा. तुमचे विचार महत्त्वाचे ठरतील. नवे परिचय फायदेशीर ठरतील. व्यवहारात नवे शिकाल. घरातील कामे होतील.

शुभ दिनांक : 7, 8

कुंभ – प्रवासात सावध रहा

कुंभेच्या धनेषात बुध, स्वराशीत शुक्र. फायदेशीर वाटणारी योजना नीट तपासून पहा. नवे परिचय उत्साहवर्धक ठरतील. प्रवासात सावध रहा. संताप होईल. प्रकृतीची काळजी घ्या. नोकरीत वर्चस्व राहील. धंद्यात गोड बोला. राजकीय, सामाजिक क्षेत्रात महत्त्व वाढेल. जनसंपर्क वाढेल. तुमच्या धैर्याचे कौतुक होईल.

शुभ दिनांक : 3, 5

मीन – सतर्क रहा

स्वराशीत बुध, व्ययेषात शुक्र. इतरांच्या सांगण्यावरून स्वतचे मत तयार करू नका. भावना जपा. प्रकृतीची काळजी घ्या. नवे परिचय धोकादायक ठरू शकतील. कायद्याला धरून बोला. नोकरीत व्याप राहील. धंद्यात चूक नको. गोड बोला. राजकीय, सामाजिक क्षेत्रात सतर्क रहा. तटस्थ धोरण ठेवा. प्रतिक्रिया देणे टाळा.

शुभ दिनांक : 3, 5