साप्ताहिक राशिभविष्य – रविवार 4 फेब्रुवारी ते शनिवार 10 फेब्रुवारी 2024

>> नीलिमा प्रधान

मेष – कामे मार्गी लागतील

मेषेच्या दशमेषात मंगळ, बुध-प्लुटो युती. सप्ताहाच्या सुरुवातीला दगदग, धावपळ, तणाव जाणवेल. त्यानंतर तुमची कामे मार्गी लागतील. नोकरीत कष्टाचे चीज होईल. धंद्यात वाढ होईल. थकबाकी मिळवा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात विरोधकांना शह देता येईल. प्रतिष्ठा मिळेल. जनसंपर्क वाढेल. घरातील व्यवहार पूर्ण करता येतील.

 शुभ दिनांक : 6, 7

वृषभ – मौल्यवान वस्तू जपा

वृषभेच्या भाग्येषात मंगळ, चंद्रöबुध युती. आरोग्याची काळजी घ्या. कोणताही निर्णय भावनेच्या आहारी न जाता घ्या. नोकरीत यश मिळेल. धंद्यात उधारी नको. मौल्यवान वस्तू जपा. राजकीय सामाजिक क्षेत्रात गुप्त कारवाया वाढतील. मोह, व्यसन टाळा. जवळच्या व्यक्तीद्वारे त्रास होईल. प्रतिष्ठा राहील. खर्च वाढेल. कठीण कामे करून घ्या.

शुभ दिनांक: 4, 10

मिथुन – सौम्य बोलणे  हितावह

मिथुनेच्या अष्टमेषात मंगळ, चंद्र-शुक्र युती. सप्ताहात अडचणी वाढतील. वाद उद्भवतील. कुठेही कायदा मोडू नका. सौम्य, गोड बोलणे हितावह ठरेल. नोकरीत दगदग, संताप जाणवेल. धंद्यात मधुर वाणीच उपयुक्त ठरेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात विरोधक तुमच्या चुका दर्शवतील. प्रवासात सावध रहा. कठोर शब्द समस्या निर्माण करतील.

शुभ दिनांक ः 6, 7

कर्क – अनाठायी खर्च टाळा

कर्केच्या सप्तमेषात मंगळ, बुध-प्लुटो युती. जवळच्या व्यक्ती समस्या निर्माण करतील. खंबीर निर्णय घ्यावा लागेल. व्यवहारात दृष्टिकोन बदलावा लागेल. भावनेच्या आहारी जाऊ नका. खाण्यापिण्याबाबत दक्ष रहा. त्रास उद्भवू शकतो. राजकीय, सामाजिक क्षेत्रात गुप्त कारवाया वाढतील. संयम ठेवा. प्रतिष्ठा वाढेल. अनाठायी खर्च होईल.

शुभ दिनांक ः 4, 5

सिंह – धंद्यात कायदा पाळा

सिंहेच्या षष्ठात मंगळ, चंद्र-शुक्र युती. स्वतच्या प्रकृतीकडे लक्ष द्या. कोणतेही वक्तव्य संयमाने व विचारपूर्वक करा. नोकरी टिकवा. धंद्यात कायदा पाळा. व्यवहारी दृष्टिकोन महत्त्वाचा ठरेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात मनाविरुद्ध घटना घडतील. नम्रता, सहनशीलता उपयुक्त ठरतील. उतावळेपणा कुठेही करू नका.

शुभ दिनांक ः 6, 7

कन्या – आग्रही भूमिका नको

कन्येच्या पंचमेषात मंगळ, शुक्र-हर्षल त्रिकोणयोग. मानसिक दडपण येईल. आग्रही भूमिका घेऊ नका. नोकरीत प्रतिष्ठा वाढेल. धंद्यात वस्तू जपा. फसगत टाळा. राजकीय, सामाजिक क्षेत्रांत अनेक परिचय होतील. भाळून जाऊ नका. मुलांसोबत मतभेद होतील. आरोग्याची काळजी घ्या. व्यवहारात घाई नको. प्रवासात सावध रहा.

शुभ दिनांक ः 5, 10

तूळ – आत्मविश्वास वाढेल

तुळेच्या सुखस्थानात मंगळ, चंद्र-गुरू त्रिकोणयोग. उत्साह, आत्मविश्वास वाढेल. कठीण कामे कराल. दुखापत, वाद टाळा. नोकरीत दगदग होईल. धंद्यात धावपळ होईल. कोणतेही विधान भावनेच्या आहारी न जाता करा. राजकीय, सामाजिक क्षेत्रांत स्पर्धा करणारे, टीकात्मक भाष्य करणारे वाढतील. तुमच्या ध्येयावर, कामावर लक्ष द्या.

शुभ दिनांक ः 4, 5

वृश्चिक – प्रत्येक दिवस यश देणारा

वृश्चिकेच्या पराक्रमात मंगळ, चंद्र-शुक्र युती. चुका सुधारता येतील. अनेकांचे सहकार्य महत्त्वाचे ठरेल. मोठा निर्णय घ्याल. प्रत्येक दिवस यश देणारा ठरेल. नोकरीधंद्यात सुधारणा होईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रांत गैरसमज दूर सारून नव्या उमेदीने पुढे जाता येईल. प्रतिष्ठा व मान लाभेल. लोकप्रियता वाढेल. जीवनाला दिशा द्या.

शुभ दिनांक ः 6, 7

धनु – प्रगतीपथावर राहाल

धनुच्या धनेषात मंगळ, चंद्र-गुरू त्रिकोणयोग. मंगळवारपासून प्रत्येक कामाला योग्य दिशा देता येईल. उत्साह, आत्मविश्वासात भर पाडणारी घटना घडेल. नोकरीत भरभराट होईल. चांगला बदल घडेल. धंद्यात वाढ होईल. वसुली करा. राजकीय, सामाजिक क्षेत्रांत अनेक अनुभवांनी लाभलेल्या बुद्धिचातुर्याचा वापर करा. प्रगतीचा नवा झेंडा रोवता येईल.

शुभ दिनांक ः 7, 10

मकर – व्यवहारात मोह नको

स्वराशीत मंगळ, बुध-प्लुटो युती. थट्टामस्करी करताना काळजी घ्या. मैत्रीत, नात्यात गैरसमज येतील, व्यवहारात मोह नको. व्यसनांपासून दूर रहा. नोकरीत वर्चस्व राहील. धंद्यात योग्य निर्णय घ्या. राजकीय, सामाजिक क्षेत्रांत मनस्ताप, खर्च होईल. कामाचा उत्साह, आत्मविश्वास वाढेल. नव्या उमेदीने पुढे जाल. ध्येय निश्चित करा आणि काम करत रहा.

शुभ दिनांक ः 5, 10

कुंभ – सौम्य भाषेत उत्तर द्या

कुंभेच्या व्ययेषात मंगळ, बुध-प्लुटो युती. स्मितहास्य नि प्रतिक्रिया प्रत्येक ठिकाणी उपयुक्त ठरेल. प्रवासात सावध रहा. कायदा पाळा. आरोपांना सौम्य भाषेत उत्तर द्या. नोकरी टिकवा, चुका टाळा. धंद्यात उतावळेपणा नको. राजकीय, सामाजिक क्षेत्रात धाडसी वागणे मनस्ताप देणारे ठरेल. चांगल्या कामासाठी बुद्धिमत्ता, शक्ती जपून ठेवा.

शुभ दिनांक ः 4, 5

मीन – प्रत्येक दिवस यश देणारा

मीनेच्या एकादशात मंगळ, चंद्र-बुध युती. प्रत्येक दिवस यश देणारा ठरेल. नोकरीधंद्यात सुधारणा होईल. लाभ व प्रगती होईल. किचकट कामे रेंगाळत ठेवू नका. दिग्गज व्यक्तींचा सहवास लाभेल. भेट, चर्चा उपयुक्त ठरेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रांत महत्त्वाचे यश मिळेल. प्रतिष्ठा, लोकप्रियता वाढेल. प्रकृती सुधारेल. चांगल्या कामाचे समाधान मिळेल.

शुभ दिनांक ः 4, 5