
>> मानसी इनामदार
मेष : नव्या कल्पना
सणासुदीचे दिवस सुरु असल्यामुळे या आठवडय़ात खर्च भरपूर वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे आर्थिक बचतीकडे लक्ष द्या. अनावश्यक खर्च टाळा. कामाच्या ठिकाणी वातावरण चांगले राहील. नवीन कल्पना सुचतील. पिवळे वस्त्र परिधान करा.
शुभ परिधान – सोन्याचा अलंकार, उपवस्त्र
वृषभ : प्रेमात यश
तरुणाईसाठी अत्यंत चांगला आठवडा आहे. अनेक वर्षे सुरु असलेल्या प्रेमात निश्चित यश मिळेल. हाती घेतलेले काम पूर्ण कराल. परीक्षेला बसत असाल तर त्यात यश नक्की आहे. लाल रंग जवळ बाळगा. त्यामुळे आत्मविश्वास वाढेल.
शुभ परिधान – रेशमी वस्त्र, केशालंकार
मिथुन : वेलचीचे दूध
पती-पत्नीच्या नात्यातील गोडवा वाढेल. थोडे वादाचे प्रसंग उद्भवतात. पण आपसातील प्रेमानेच त्यावर मात कराल. दोघेही वेलची घातलेले दुध प्या. त्यामुळे आपसातील प्रेम वाढेल. त्यामुळे कुटुंबाचे बंधही मजबूत होतील. एखादी सहल आयोजित कराल. गुलाबी रंग जवळ बाळगा. शुभ परिधान – हिरा, सुगंध
कर्क : खरेदी होईल
सण उत्सवाचे वेध लागतील त्यामुळे घरात आनंदी वातावरण राहील.. घरातील ज्येष्ठांचे आशीर्वाद नेहमीच फलदायी ठरतात. निळा रंग लाभदायक. त्यामुळे मन प्रसन्न राहील. व्यवसायात यश मिळेल. कामाच्या ठिकाणी थोडे वाद होतील. ते टाळण्याचा प्रयत्न करा.
शुभ परिधान – खादीचे वस्त्र, नासिकालंकार
सिंह : लक्ष्मीचा आशीर्वाद
या आठवडय़ात सोन्याची खरेदी होईल. त्यामुळे लक्ष्मीचा वास सदैव तुमच्या घरात राहील. कामात यश मिळेल. शेवंतीचे फुल जवळ बाळगा. पिवळा रंग लाभदायक. अपरिचितांपासून सावध राहा. गृहिणींसाठी धावपळीचा आठवडा.
शुभ परिधान – जोडवी, नऊवार साडी
कन्या : काम होणार
घरातील गृहिणींसाठी हा आठवडा जितका धावपळीचा ठरेल तितकाच आनंदीही ठरणार आहे. अनपेक्षित धनलाभ होईल. तरुण वर्गास उत्तम नोकरी मिळण्याचे योग आहेत. जांभळा रंग मुलाखतीसाठी जाताना जवळ बाळगा. हमखास काम होईल.
शुभ परिधान – साडी, धोतर
तूळ : घरात समृद्धी
कामाचे खूपच दडपण असेल. पण आर्थिक लाभ त्यातूनच होतील. त्यामुळे ताण जाणवणार नाही. पण प्रकृतीची काळजी घ्या. आहारातील मिठाचे प्रमाण कमी करा. घरातील लहानांमुळे मन प्रसन्न राहील. हिरवा रंग जवळ ठेवा. घरात अन्नधान्य नेहमी भरलेले राहील.
शुभ परिधान – गुलाब, रुद्राक्ष
वृश्चिक : उपासना करा
हा आठवडा पैसे खर्च होण्याचा आहे. पण ते योग्य जागी होतील. त्यामुळे त्याची खंत बाळगू नका. त्या गुंतवलेल्या पैशाचे व्याजही भरभक्कम मिळेल. देवावरची श्रद्धा ढळू देऊ नका. संत सज्जनांचे आशीर्वाद महत्वाचे असतात. आकाशी रंग जवळ ठेवा.
शुभ परिधान – कुर्ता, फॅन्सी दागिना
धनु : कलाकारांचा आठवडा
घरातील रखडलेली कामे पूर्ण कराल. नव्या ओळखी होतील. त्यातून कामासाठी फायदा होईल. त्याचा आर्थिक लाभ होईल. कलाकारांसाठी हा आठवडा चांगला जाईल. नवीन काम मिळेल. पिवळा रंग जवळ ठेवा.
शुभ परिधान – गळ्यात साखळी, रुमाल
मकर : मुलांची प्रगती
आहारात थंड पदार्थांचा समावेश करा. या आठवडय़ात घरात थोडे वादाचे प्रसंग येतील. शांतपणे मार्ग काढा. पैशाचा अपव्यय होईल. त्यामुळे मनाला त्रास होईल. स्वामी समर्थांचे स्मरण करा. मोतिया रंग जवळ बाळगा.
शुभ परिधान – ठेवणीतील कपडे, फेटा
कुंभ : वरिष्ठांची मर्जी
घरापासून दूर राहण्याचे योग आहेत. पण चांगल्या माणसांच्या संपर्कात राहाल. त्याचा कामावर सकारात्मक परिणाम होईल. तुमच्या कल्पना वरिष्ठांना आवडतील. डोळ्यांना त्रास होईल. राखाडी रंग जवळ ठेवा.
शुभ परिधान – सुती शर्ट, पैठणी
मीन : सत्याचा मार्ग
अत्यंत सात्विक स्वभावाची तुमची रास. त्याचा बरेचजण गैरफायदा घेतात. याही आठवडय़ात अपरिचितांपासून सावध राहा. प्रेमीजनांसाठी गुलाबी आठवडा. प्रेमात यश मिळेल. कामाठी उत्तम यश संपादन कराल. सत्याचा मार्ग सोडू नका. चंदेरी रंग जवळ ठेवा.
शुभ परिधान – डिझायनर गाऊन, हीरा





















































