साप्ताहिक राशिभविष्य- रविवार 9 ते शनिवार 15 फेब्रुवारी 2020

278

>> नीलिमा प्रधान

मेष
डाव सावधपणे टाका
मेषेच्या एकादशात सूर्य राश्यांतर, चंद्र-शनी त्रिकोणयोग होत आहे. तुम्हाला विरोध करणारे लोक नमते धोरण घेतील. राजकारणात तुम्हाला मदत करण्याचे आश्वासन देतील. तुम्ही सावधपणे डाव टाका. यश मिळेल. व्यवसाय-नोकरीत तुम्ही प्रगती कराल. कौटुंबिक नाराजी होईल. प्रतिष्ठा राहील.
शुभ दिनांक – 10, 14

वृषभ
व्यवसायात टिकून राहा
वृषभेच्या दशमेशात सूर्य राश्यांतर, चंद्र-शुक्र प्रतियुती होत आहे. तुमच्या बुद्धीचा व जिद्दीचा कस या आठवडय़ात लागेल. व्यवसायात टिकून राहता येईल. नोकरीत वरिष्ठांचा सल्ला घ्या. राजकीय-सामाजिक कार्यात तुम्हाला लोकांच्या मनातील हितगुज जाणून घेता येईल. कार्याला नवे वळण देता येईल. शुभ दिनांक – 9, 12

मिथुन
महत्त्वाची बातमी मिळेल
मिथुनेच्या भाग्येषात सूर्य राश्यांतर, चंद्र-गुरू त्रिकोणयोग होत आहे. आठवडय़ाच्या शेवटी महत्त्वाची बातमी मिळेल. व्यवसायात सावध भूमिका घ्या. नवीन परिचयामुळे कार्यक्षेत्रात विशेष यश मिळेल. नोकरीत तटस्थ राहा. राजकीय क्षेत्रात प्रभाव दिसेल. स्पर्धेत टिकून राहणे महत्त्वाचे आहे.
शुभ दिनांक – 13, 14

कर्क
मनोधैर्य टिकून राहील
कर्केच्या अष्टमेशात सूर्य राश्यांतर, चंद्र-शुक्र प्रतियुती होत आहे. आठवडय़ाच्या सुरुवातीला महत्त्वाचे काम करा. भेट घ्या. चर्चा करा. तुमचे मनोधैर्य टिकून राहील. व्यवसायात अडचणीवर मात कराल. राजकीय-सामाजिक क्षेत्रांत जनसंपर्क वाढवा. कौटुंबिक बाबतीत सुखद समाचार मिळेल.
शुभ दिनांक – 9, 11

सिंह
प्रगतीसाठी मेहनत घ्या
सिंहेच्या सप्तमेषात सूर्य राश्यांतर, चंद्र-गुरू त्रिकोणयोग होत आहे. स्पर्धेत प्रगती करावयाची असेल तर अनेक युक्त्या शिकाव्या लागतात. मेहनत घ्यावी लागते. तुम्ही ज्या क्षेत्रात असाल तेथे वर्चस्व सिद्ध करण्यासाठी चौफेर सावध राहा. मनावर दडपण येईल. नोकरी-धंद्यात कामाचा व्याप वाढेल.
शुभ दिनांक – 13, 14

कन्या
आर्थिक लाभ होईल
कन्येच्या षष्ठेशात सूर्य राश्यांतर, चंद्र-शुक्र प्रतियुती होत आहे. कधी कधी क्षुल्लक वाटणारी व्यक्तीसुद्धा महत्त्वाची भूमिका निभावून नेते. म्हणून कोणाला कमी लेखू नका. राजकीय- सामाजिक क्षेत्रांत प्रगतीचा मार्ग शोधा. रागावर ताबा ठेवा. व्यवसायात स्पर्धेत तुमचे कौतुक होईल. आर्थिक लाभ होईल. शुभ दिनांक – 9, 15

तूळ
सावध राहा
तुळेच्या पंचमेषात सूर्य राश्यांतर, चंद्र-बुध प्रतियुती होत आहे. चातुर्याचे बोलणे उपयुक्त ठरेल. नोकरीत जवळचे लोक कारस्थान करतील. राजकीय-सामाजिक क्षेत्रांत प्रतिस्पर्धी तुमच्यावर टीकास्त्र सोडतील. चूक शोधण्याचा प्रयत्न करतील. आप्तेष्टांची नाराजी होईल. हलगर्जीपणा नको.
शुभ दिनांक – 14, 15

वृश्चिक
शेअर्सचा अंदाज येईल
वृश्चिकेच्या सुखस्थानात सूर्य राश्यांतर, चंद्र-शुक्र प्रतियुती होत आहे. कौटुंबिक सौख्यात भर पडेल. व्यवसाय-नोकरीत तारतम्य ठेवा. शेअर्सचा अंदाज घेता येईल. राजकीय-सामाजिक क्षेत्रात विरोधकांना शह देण्यात यश मिळेल. तुम्ही लोकांची दिशाभूल करीत आहात असा आरोप होईल.
शुभ दिनांक – 9, 11

धनु
संमिश्र अनुभवांचा काळ
धनु राशीच्या पराक्रमात सूर्य राश्यांतर, चंद्र-बुध प्रतियुती होत आहे. मनावर दडपण येईल. आप्तेष्टांच्या भेटी होतील. नोकरी, व्यवसायात जम बसेल. राजकीय-सामाजिक क्षेत्रांत स्थान टिकवता येईल. घर, जमीन यासंबंधी समस्या सोडवा. कोर्ट केस यशस्वी होईल. नाटय़, चित्रपट, क्रीडा क्षेत्रांत कौतुकाचा वर्षाव होईल.
शुभ दिनांक – 11, 12

मकर
स्वतःच्या कार्यावर लक्ष द्या
मकरेच्या धनेषात सूर्य राश्यांतर, चंद्र-बुध प्रतियुती होत आहे. व्यवसायात सुधारणा करा. समस्या सोडवा. नवे गुंतवणूकदार मिळतील. कोर्ट केस मार्गी लावा. प्रवासात सावध राहा. राजकीय-सामाजिक क्षेत्रांत जनहिताचा मुद्दा नव्याने मांडता येईल. स्वतःच्या कार्यावर लक्ष द्या. कलाक्रीडा क्षेत्रांत दिग्गजांचा परिचय होईल.
शुभ दिनांक – 9, 13

कुंभ
जबाबदारी वाढेल
स्वराशीत सूर्य राश्यांतर, चंद्र-शुक्र प्रतियुती होत आहे. साडेसाती सुरू आहे. तुमचा अपप्रचार करणारे लोक सप्ताहाच्या शेवटी गप्प होतील. तुमची बाजू मांडली जाईल. योग्य ठिकाणी गुंतवणूक करा. राजकीय-सामाजिक क्षेत्रांत जबाबदारी वाढेल. व्यापक स्वरूपाचे अनुभव येतील. नवे मित्र जोडाल.
शुभ दिनांक – 14, 15

मीन
कामाचा व्याप वाढेल
मीनेच्या व्ययेषात सूर्य राश्यांतर, चंद्र-गुरू त्रिकोणयोग होत आहे. व्यवसायात सहनशीलता ठेवा. नोकरीत अडचणीत टाकणारे काम तुमच्याकडे दिले जाण्याची शक्यता आहे. राजकीय-सामाजिक क्षेत्रांत दडपण राहील. कामाचा व्याप वाढेल. नाटय़, चित्रपट, क्रीडा क्षेत्रांत मैत्री वाढेल.
शुभ दिनांक – 9, 12

आपली प्रतिक्रिया द्या