साप्ताहिक राशीभविष्य – रविवार 26 जून ते शनिवार 2 जुलै 2022

>> नीलिमा प्रधान

मेष – यश खेचून आणाल
स्वराशीत मंगळ, मेषेच्या पराक्रमात बुध राश्यांतर. क्षेत्र कोणतेही असो, कठीण प्रसंगावर मात करण्याचा प्रयत्न करता येईल. जिद्दीने यश खेचून आणता येईल. व्यवसायात फायदा होईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात आरोप खोडता येईल. प्रकृतीत सुधारणा होईल. कलाक्षेत्रात विशेष घटना घडेल. शुभ दिनांक ः 26, 29

वृषभ – हिशेबात चूक नको
वृषभेच्या व्ययेशात मंगळ, धनेशात बुध राश्यांतर, प्रत्येक दिवस प्रगतीकारक असेल. रागावर ताबा ठेवा. प्रवासात कायदा पाळा. नोकरीधंद्यात आघाडीवर राहाल. बदल करण्याची संधी मिळेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात तुमचे मुद्दे प्रभावी ठरतील. कुटुंबात सुखद घटना घडेल. शुभ दिनांक ः 1, 2

मिथुन – वर्चस्व वाढेल
मिथुनेच्या एकादशात मंगळ, स्वराशीत बुध राश्यांतर. आठवडय़ाच्या सुरुवातीला तणाव निर्माण होईल. भावनेच्या आहारी न जाता निर्णय घ्या. जास्त मोह ठेवू नका. नोकरीत वर्चस्व वाढेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात मानप्रतिष्ठा वाढवणारे कार्य संपन्न करू शकाल. तारतम्य सोडू नका. शुभ दिनांक ः 1, 2

कर्क – चर्चा करताना भान ठेवा
कर्केच्या दशमेशात मंगळ, व्ययेशात बुध राश्यांतर. अतिशयोक्तीपूर्ण वागणे टाळा. धंद्यात नवे धोरण ठरवा. नोकरीत तणाव, चिंता निर्माण होईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात चर्चा करताना भान ठेवा. कुणाचा अपमान होणार नाही याची काळजी घ्या. कोर्टाच्या कामात नम्र रहा. संसारात कामे वाढतील. शुभ दिनांक ः 1, 2

सिंह – महत्त्वाची कामे करा
सिंहेच्या भाग्येशात मंगळ, एकादशात बुध राश्यांतर. महत्त्वाची कामे करण्याचा प्रयत्न करा. व्यवसायात फायद्याचे काम मिळेल. नोकरीत वरिष्ठांची मर्जी राखता येईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात काळ, काम, वेगाचे गणित विसरू नका. समस्या सोडविण्याचा प्रयत्न करा. स्पर्धेत महत्त्व टिकवा. शुभ दिनांक ः 26, 27

कन्या – अधिकाराचे पद लाभेल
कन्येच्या अष्टमेशात मंगळ, दशमेशात बुध राश्यांतर. संयम, सातत्य ठेवल्यास तुमच्या क्षेत्रात प्रगतीचे नवे पाऊल टाकाल. व्यवसायात वाढ होईल. नवा परिचय उत्साहवर्धक ठरेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात अधिकाराचे पद मिळेल. योजना पूर्ण कराल. कामात यश मिळेल. कौटुंबिक प्रश्न सोडवाल. शुभ दिनांक ः 26, 27

तूळ – रेंगाळलेली कामे होतील
तुळेच्या सप्तमेशात मंगळ, भाग्येशात बुध राश्यांतर. आठवडय़ाच्या सुरुवातीला अडचणी येतील. रेंगाळलेली कामे पूर्ण करा. व्यवसायात चूक करू नका. प्रवासात घाई नको. खिसा, पाकीट सांभाळा. नोकरीत वरिष्ठांची मर्जी राखा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात गुप्त शत्रंtबाबत सावध रहा. प्रतिष्ठा राखता येईल. शुभ दिनांक ः 1, 2

वृश्चिक – कायदा पाळा
वृश्चिकेच्या षष्ठsशात मंगळ, अष्टमेशात बुध राश्यांतर. तणावग्रस्त परिस्थितीत अपशब्द वापरू नका. कायद्याच्या चौकटीत राहून काम करा. व्यवसायात नवी कल्पना फायदेशीर ठरेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात चौफेर सावध रहा. जनतेला दिलेला शब्द पाळणे कठीण होईल. कलाक्षेत्रात पुढे जाल . शुभ दिनांक ः 26, 27

धनु – महत्त्वाची कामे करा
धनुच्या पंचमेशात मंगळ, सप्तमेशात बुध राश्यांतर. मैत्रीत तणाव निर्माण होईल. वाद, गैरसमज वाढेल. धंद्यात नम्रता ठेवा. नोकरीत कठीण कामे करून घेतील. राजकीय, सामाजिक क्षेत्रातील महत्त्वाची कामे करून घेण्याचा प्रयत्न करा. जवळच्या व्यक्ती अडचणी निर्माण करतील. स्पर्धेत जिद्द ठेवा. शुभ दिनांक ः 29, 30

मकर – परिचय प्रेरणादायी ठरेल
मकरेच्या सुखस्थानात मंगळ, षष्ठsशात बुध राश्यांतर. चर्चा करताना रागावर ताबा ठेवा. प्रकृतीची काळजी घ्या. कल्पनाशक्तीला चालना मिळेल. नवीन परिचय प्रेरणादायी ठरेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात तुमचे महत्त्व कमी करण्याचा डाव रचला जाईल. प्रवासात घाई नको. घरातील वृद्ध व्यक्तीची चिंता वाटेल. शुभ दिनांक ः 1, 2

कुंभ – सावधपणे व्यवहार करा
कुंभेच्या पराक्रमात मंगळ, पंचमेशात बुध राश्यांतर. क्षेत्र कोणतेही असो, अडचणी येतील. व्यवसायात सावधपणे व्यवहार करा. नोकरीत कामाचा व्याप वाढला तरी वर्चस्व राहील. राजकीय, सामाजिक क्षेत्रात टीकात्मक चर्चा होईल. अधिकार लाभतील. प्रतिष्ठा वाढविणारी घटना घडेल. स्पर्धेत टिकून राहाल. शुभ दिनांक ः 29, 30

मीन -अहंकार दूर ठेवा
मीनेच्या धनेशात मंगळ, सुखस्थानात बुध राश्यांतर. प्रत्येक दिवस यश देणारा ठरेल. अहंकार ठेवू नका. तडजोडीची भाषा यश देईल. नोकरीत वरिष्ठांना कमी लेखू नका. राजकीय, सामाजिक क्षेत्रात स्पर्धा करणारे लोक समोर येतील. साडेसाती सुरू आहे. तटस्थ धोरण ठेवा. शुभ दिनांक ः 1, 2