आठवड्याचे भविष्य – रविवार 18 ते शनिवार 24 ऑक्टोबर 2020

>> नीलिमा प्रधान

मेष -तुमचे महत्त्व वाढेल
मेषेच्या षष्ठशात शुक्र राश्यांतर, सूर्य-चंद्र लाभयोग होत आहे. प्रवासात सावध रहा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात किचकट समस्येवर तुमचा विचार घेतला जाईल. तुमचे महत्त्व वाढेल. कुटुंबात तणाव निर्माण होईल. नोकरीत जबाबदारी घेत इतरांच्या चुका नीट कराव्या लागतील. शिक्षणात आळस नको. शुभ दिनांक ः 18, 21

वृषभ – संयम बाळगत परिस्थिती हाताळा
वृषभेच्या पंचमेशात शुक्र राश्यांतर, बुध-हर्षल युती होत आहे. कोणतीही चर्चा वादाकडे जाऊ शकते. राजकीय, सामाजिक क्षेत्रात तुमच्याकडून झालेली चूक सर्वांच्या लक्षात येईल. नोकरीत बेसावध राहू नका. नम्रता, संयम बाळगत परिस्थिती हाताळा. कला, साहित्यात मेहनत घ्या.
शुभ दिनांक ः 19, 20

मिथुन – खंबीरपणा महत्त्वाचा ठरेल
मिथुनच्या सुखेशात शुक्र राश्यांतर, सूर्य-चंद्र लाभयोग होत आहे. तुमचा आत्मविश्वास टिकून राहील. अडचणीतून मार्ग काढाल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात खंबीर राहून प्रश्न सोडवा. प्रतिष्ठsला शोभेसे कार्य होईल. व्यवसायात मेहनत घ्यावी लागेल. शिक्षणात मागे राहू नका.
शुभ दिनांक ः 21, 22
कर्क – विचारपूर्वक प्रतिक्रिया द्या
कर्केच्या पराक्रमात शुक्र राश्यांतर, चंद्र-शुक्र लाभयोग तुमच्या अडचणी कमी करेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात विचारपूर्वक प्रतिक्रिया व्यक्त करा. नोकरीत कामाचा व्याप वाढेल. वरिष्ठांच्या मर्जीनुसार निर्णय घ्यावा लागेल. कला क्षेत्रात विशेष परिचय होईल. कल्पनाशक्तीला चालना मिळेल.
शुभ दिनांक ः 18, 19

सिंह – रागावर ताबा ठेवा
सिंहेच्या धनेशात शुक्र राश्यांतर, चंद्र-गुरू युती होत आहे. किचकट प्रश्न मार्गी लावावे लागतील. राजकीय, सामाजिक क्षेत्रात कोणताही प्रश्न रेंगाळत ठेवू नका. विरोधकांना शह देण्यात यश मिळेल. नोकरीत वर्चस्व राहील. व्यवसायात मोठे काम मिळेल. रागावर ताबा ठेवा. शुभ दिनांक ः 21, 22

कन्या – नव्या विषयाची प्रेरणा मिळेल
स्वराशीत शुक्र राश्यांतर, सूर्य-चंद्र लाभयोग होत आहे. प्रत्येक दिवस तुम्हाला यशाचा मार्ग देणारा ठरेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात तुमच्याकडे महत्त्वाचा मुद्दा असेल. लोकांच्या मनातील गैरसमज दूर कराल. योजना पूर्ण कराल. कला, साहित्यात नव्या विषयाची प्रेरणा मिळेल.
शुभ दिनांक ः 23, 24

तूळ – प्रवासात घाई नको
तुळेच्या व्ययेशात शुक्र राश्यांतर, चंद्र-गुरू युती होत आहे. क्षेत्र कोणतेही असो, गैरसमज टाळा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात महत्त्वाच्या प्रश्नांवर निर्णय घेण्यात यश मिळेल. इतरांच्या कामात मदत करण्यात वेळ जाईल. कठोर बोलणे टाळा. प्रवासात घाई नको. नवीन ओळखीत जपून व्यवहार करा.
शुभ दिनांक ः 21, 23
वृश्चिक -मोठेपणाचा हव्यास टाळा
वृश्चिकेच्या एकादशात शुक्र राश्यांतर, चंद्र-गुरू युती होत आहे. विचारांचे संतुलन राखा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात तुमच्यावर आरोप होईल. मात्र तुमचा कोणताही मुद्दा चुकीचा ठरणार नाही याकडे लक्ष द्या. मोठेपणाचा हव्यास टाळा. कला, साहित्यात मेहनत घ्यावी लागेल. शुभ दिनांक ः 21, 22
धनु – कामाचे नियोजन करा
धनुच्या दशमेशात शुक्र राश्यांतर, सूर्य-चंद्र लाभयोग होत आहे. क्षेत्र कोणतेही असो, तुमच्या कार्याला गती मिळेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात कामाची पद्धतशीर आखणी करा. व्यवसायातील त्रुटी कमी करून चांगली सुधारणा कराल. कला, साहित्य, शिक्षण क्षेत्रात मनाप्रमाणे पुढे जाल.
शुभ दिनांक ः 23, 24
मकर – विचारांना चालना मिळेल
मकरेच्या भाग्येशात शुक्र राश्यांतर, सूर्य-चंद्र लाभयोग होत आहे. बुधवार, गुरुवार तणावाचा प्रसंग निर्माण होईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात महत्त्वाच्या टप्प्यावर यश आणता येईल. लोकांच्या मनात आदर निर्माण होईल. व्यवसायात सुधारणा करण्याचा प्रयत्न करा. विचारांना चालना मिळेल.
शुभ दिनांक ः 21, 24
कुंभ – भागीदाराबरोबर मतभेद होतील
कुंभेच्या अष्टमेशात शुक्र राश्यांतर, सूर्य-चंद्र लाभयोग होत आहे. मनावर दडपण येईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात तुमचे मुद्दे प्रभावी ठरतील. आहाराची काळजी घ्या. व्यवसायात भागीदाराबरोबर मतभेद निर्माण होतील. गुंतवणूक करताना विचार करा. नवीन ओळखीवर भाळू नका. शुभ दिनांक ः 18, 21
मीन -उतावळेपणा दूर ठेवा
मीनेच्या सप्तमेशात शुक्र राश्यांतर, चंद्र-गुरू युती होत आहे. रविवारी रागाचा पारा वाढेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात ऐकीव गोष्टींवर विश्वास ठेवू नका. नोकरीत उतावळेपणा नको. वरिष्ठांचा सल्ला ऐका. साहित्यात विचारांना चालना मिळेल. प्रवासात घाई नको.
शुभ दिनांक ः 23, 24

आपली प्रतिक्रिया द्या